LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

माणवाडी-तावशी रस्ता पाहणी करून जागीच प्रशासनाला दुरुस्तीचा दिला आदेश

  तावशी - मानवाडी येथील येथील रस्ता अतिशय खराब झाला आहे. परिणामी येथील लोकांना खूप त्रास होत आहे. रस्ता दुरुस्तीसाठी प्रशासनाला वारंवार विनंत्या केल्या, निवेदने दिली, आंदोलने केली परंतु त्याला प्रशासनाने दाद दिली नाही. म्हणून येथील युवक नेते श्री.अनिल यादव आणि परिसरातील नागरिकांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आमदार समाधानदादा आवताडे यांना प्रत्यक्ष भेटून, रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी. शेवटचा पर्याय म्हणून आम्ही आपणाकडे मोठ्या आशेने आलो आहोत अशा आशयाचे निवेदन दिले होते.

  त्यावरून कार्यसम्राट आमदार मा.समाधान दादा आवताडे साहेबांनी आज वेळात वेळ काढून, स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन  माणवाडी-तावशी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून, संबंधित प्रशासनाला जागीच रस्ता दुरुस्तीचे आदेश दिले. आणि येत्या चार दिवसात मला हे काम पूर्ण झालेले दिसले पाहिजे म्हणून सांगितले.

  यावेळी त्यांनी येथील श्री.समाधान शंकर यादव यांचे निवासस्थानी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला आणि अडी-अडचणी जाणून घेतल्या. यावेळी माणवाडी, तावशी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व मा. सभापती विजय सिंह दादा देशमुख,अनिल यादव मि. ग्रामपंचायत सदस्य, कौशिक भाव यादव, समाधान यादव, रावसो आप्पा यादव. किसन यादव चेअरमन,विलास यादव. मारूती भाव धुरुपे, डॉ. आनंदा यादव. महादेव आसबे. हनमंत नागणे, नामदेव यादव, संभाजी यादव साहेब, तानाजी यादव, नवनाथ यादव, पांडूरंग आबा आसबे( माजी सरपंच), शिवाजी तात्या शिदे,किसन आसबे, आशिष यादव, बाळसो आसबे, राजाराम क्षिरसागर माजी उपसरपंच,आनंदा अनुसे, मारूती पिसे, सिताराम पिसे, शंकर गोडसे, श्री.बालम मुलाणी साहेब व मानवाडी परिसरातील सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments