पंढरपूर प्रतिनिधी -
पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन शुक्रवार दिनांक२९ सप्टेंबर रोजी सकाळी१०वाजता वडार भवन करकंब येथे केलेले आहे.
तरी तालुक्यातील जास्तीत जास्त गरजू लोकांनी खालील दाखल्यांच्या लाभ घ्यावा. असे आवाहन भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभाग पंढरपूर तालुका संयोजक मनोज पवार यांनी केलेले आहे.
यामध्ये जातीचे दाखले ,उत्पन्नाचे दाखले, ज्या रेशनिंग धारकांना धान्य भेटत नाही अशा लोकांना धान्य भेटण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया करणे, संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ योजना, व अन्य काही दाखले मिळणार असून रेशनिंग धारकांनी रेशनिंग कार्डची झेरॉक्स, तलाठ्याचा उत्पन्नाचा दाखला, व रेशनिंग कार्ड वरील सर्व व्यक्तींची आधार कार्डचे झेरॉक्स इ.कागदपत्रे जातीचा दाखला मिळण्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, पुराव्यासाठी OBC - 1967, VJNT -1961 SC - 1950 SBC - 1967 अगोदरचा जन्म दाखला, पॅन कार्ड , उत्पन्नाच्या दाखल्यासाठी - तलाठ्याचा उत्पन्नाचा दाखला ,आधार कार्ड, पॅन कार्ड ,रेशन कार्ड झेरॉक्स फोटो इ.तरी वरील प्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करून वरील दाखल्यांचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त गरजु लोकांनी करकंब येथील वडार भवन येथे शुक्रवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे.


0 Comments