पंढरपूर प्रतिनिधी -
आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून मनसे नेते दिलीप बापू धोत्रे मनसे विद्यार्थी सेना राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली गटशिक्षणाधिकारी व तहसीलदार कार्यालय पंढरपूर यांना निवेदन देण्यात आले गणेशोत्सव काळात सर्व शाळा व महाविद्यालयांना पाच दिवस सुट्टी दिल्या बाबत त्यांनी निवेदन देण्यात आले राज्यातील गणेशोत्सव दिवाळी अन्य धार्मिक सण/उत्सव कालावधीत शाळांना अल्प मुदतीच्या सुट्ट्या देणे या कालावधी परीक्षा न घेणे याबाबत ८सप्टेंबर२०१५
रोजी शासन निर्णयाद्वारे अध्यादेश पारित केला असून धार्मिक सणांच्या सुट्ट्यांची नियोजन व त्यामध्ये बदल करण्याचा निर्णय झाला पालक शिक्षक बैठकीत तो मान्य केला जावा तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी स्थानिक ठिकाणच्या गरजेनुसार शाळा व्यवस्थापन समिती पालक शिक्षक संघ यांच्या सहमती अनुसार व शिफारसी अनुसार गणेश उत्सव दिवाळी सण उत्सव कालावधीमध्ये चाचणी परीक्षा चे आयोजन न करणे असे आदेश शाळा व्यवस्थापकांना दिले आहे तथापि राज्य मंडळाच्या शाळा व्यतिरिक्त इतर खाजगी शाळांमध्ये शिक्षण मंडळाच्या सूचनांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्याकडे अनेक पालकांनी शासन निर्णय धाब्यावर बसवणाऱ्या व मनमानी कारभार चालवणाऱ्या शालेय व्यवस्थापन विरुद्ध तक्रार केल्या आहेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सोलापूर जिल्हा व पंढरपूर तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश बनसोडे, उपजिल्हाध्यक्ष अवधूत गडकरी, तालुकाध्यक्ष प्रतापसिंह भोसले, तालुका उपाध्यक्ष रविराज शिंदे, शहराध्यक्ष प्रदीप परचंडे, अमित वाघमारे, प्रथमेश धुमाळ व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
0 Comments