पंढरपूर प्रतिनिधी :- पंढरपूर येथील संजय ननवरे यांनी आपल्या समाजकार्यातून अखंड महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण केली असून यात समाजकार्याच्या जोरावर महाराष्ट्रातील विविध समाजसेवेचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत दरम्यान आज पंढरपूर येथील त्यांच्या निवासस्थानी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकार प्रमोद भोसले यांनी त्यांना हार घालून त्यांचा सत्कार केला यावेळी बारा बलुतेदार संघाचे पंढरपूर शहर अध्यक्ष विशाल इंदापूरकर, नाभिक समाजाचे तूकाराम चह्वान माने महाराज, निखील संप्ताळ आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या समाजकार्यातून पंढरपूर शहर व तालुक्यातील असंख्य गोरगरीब व गरजूवंत लोकांना संजय ननवरे यांनी कोणत्या ना कोणत्या रोपाने मदतच केली आहे कोणताही गरजवंत माणूस त्यांच्याकडून रिकाम्या हाताने येत नाही अशी त्यांची अनोखी ओळख आज पंढरपूर पंचक्रोशीत निर्माण झाली आहे गरिबांना मदत करणे व त्यांचे काम मार्गी लावणे या त्यांच्या स्वभावामुळेच त्यांना पंढरपुरात समाजसेवक म्हणून एक नवी ओळख निर्माण झाली आहे
0 Comments