पंढरपूर प्रतिनिधी : -
साहेब यांनी राज्यातील अत्यंत प्रतिष्ठित अशा मानाच्या #महाराष्ट्र_केसरी कुस्ती स्पर्धा जिंकणारा मल्ल सिकंदर शेख यांना उद्योजक राजू खरे व जिल्हाध्यक्ष चरणराज चवरे यांच्या माध्यमातून आज ठाणे येथील निवासस्थानी येऊन भेट घेतली.
गतवर्षी प्रयत्न करूनही या विजेतेपदाने हुलकावणी दिलेल्या सिकंदरने यंदा अवघ्या २३ सेकंदात प्रतिस्पर्ध्याला अस्मान दाखवत हा किताब आपल्या नावे केला. त्याच्या या कामगिरीबाबत त्याचे कौतुक करून यासमयी त्याला शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. तसेच त्याला मिळालेली चांदीची गदा पुन्हा एकदा सन्मानपूर्वक हाती सुपूर्द केली. तसेच यावेळी त्याच्या भावी वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या. तसेच सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करू असे त्याला आवर्जून सांगितले. यावेळी सिकंदर आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते.
आहे.यावेळी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार व उद्योजक राजू खरे, शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे,ग्रामपंचायत सदस्य सज्जू शेख, पै,बाळासाहेब चवरे, लहू माने चेअरमन, अमोल दादा चवरे, अण्णा माने,रामभाऊ डोके,मुजावर सर,धनाजी खराटे,तसेच मोठया प्रमाणात शिवसेनिक उपस्थित होते.


0 Comments