संभाजी पुरीगोसावी (बीड जिल्हा) प्रतिनिधी. वडिलांचे हरपलेले छत्र, आई शालेय पोषण आहाराचा भात शिजवण्याचे काम करते त्यामुळे एकूण घरची आर्थिंक परिस्थिती जेमतेच. त्यातच कुठलीही शिक्षणाची सोय नाही शिकण्याची जिद्द आणि मनोबल खंबीर करीत. बीड जिल्ह्यातील आझादनगर मधील वास्तव्यास असणारी कन्या उजमा शेख या तरुणीने पोलीस उपनिरीक्षक होण्याचा मान मिळवला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल १८ मार्च रोजी जाहीर झाला. यामध्ये उजमा शेख हिची पोलीस खात्यात खुल्या प्रवर्गातून उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. उमजा शेखचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद कन्या शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षण हंबर्डे महाविद्यालयात झाले. उमजाने पीएसआय होण्याची स्वप्न बारावीत असतानाच पाहिले आणि ते अखेर पूर्णच केले, उजमा शेख हि चार वर्षाची असताना तिच्या वडिलांचे छत्र हरपले होते. त्यावेळी पुढे आईने सांभाळ करीत तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली तिची आई सध्या आष्टी येथील कन्या शाळेमध्ये शालेय पोषण आहाराचा भात शिजवण्याचे काम करते आई हीच माझा गुरु तीच माझी आधारवड, तिच्यामुळे यशाला गवास नाही घालता आल्याची भावना व्यक्त करताना उजमाला गहिवरुन आले, तिच्या भरारी यशाबद्दल सर्वच स्तरांतून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. यावेळी सातारा जिल्ह्याचे पुरीगोसावी यांनी उजमा शेख यांच्याशी संपर्क साधून तिचे अभिनंदन करीत पुढील सेवेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.*


0 Comments