LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पुणे जिल्ह्यातून तडीपार असून सुद्धा अग्नीशस्त्रासह रेकॉर्डवरील आरोपींच्या आवळल्या मुसक्या

सिंहगड रोड पोलीसांची कामगिरी. 

संभाजी पुरी गोसावी ( पुणे शहर) प्रतिनिधी. सध्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची करडी नजर आहे. याच अनुषंगाने पुणे शहर सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सीनियर वरिष्ठांच्या आदेशावरुन सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील कर्मचारी पोलीस पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने सदर संशयित इसम हा गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे घेवुन उभा असल्याचे पोलिसांना समजले होते. पोलीस पथकांने सदर ठिकाणी जावुन त्याचा शोध घेतला असता. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पाठलाग करीत त्याच पकडले अधिक चौकशी केली असता. त्याने प्रथम उडवाउडवीची ओढीची उत्तरे दिली. तपासा दरम्यान सदर आरोपींवर पुणे शहरांच्या विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे समोर आले, सदर आरोपी हा तडीपार असल्याचे देखील समोर आले, त्यामुळे सिंहगड पोलिसांनी सदर आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. सदर आरोपींच्या कब्जांतून सुमारे जवळपास एक ५०,०००/ रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल व पॅंटीच्या खिशात १००० / रुपये किमतीचे जिवंत काडतुसे असा एकूण ५१,०००/मुद्देमाल हस्तगत केला आहे. आदेश उर्फ ऋषिकेश राम टेमकर ( वय २१ ) रा. सुरुगांव टेमकर वस्ती मुळशी पुणे) असे या रेकॉर्डवरील आरोपींचे नाव आहे. सदरची कामगिरी अमितेश कुमार पोलीस आयुक्त श्री. प्रवीण पवार सहा. पोलीस आयुक्त प्रवीण पाटील पोलीस आयुक्त विजय कुंभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेद्रसिंह क्षीरसागर पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. सचिन निकम संतोष भांडवलकर पोलीस उपनिरीक्षक पो. अ. आबा उतेकर तानाजी तारू संजय शिंदे राजू वगेरे अमोल पाटील शिवाजी क्षीरसागर राहुल ओलेकर सागर शेडगे विनायक मोहिते स्वप्निल मगर देवा चव्हाण यांच्यासह आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला. त्यांच्या या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडूंन विशेष कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments