संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी. सध्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे महसूल विभागातील मोठी खांदेपालट झाल्याचेही चांगलेच दिसून येत आहे. पुणे महापालिका अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) पदाचा पदभार पृथ्वीराज बी.पी यांनी डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडूंन आज स्वीकारला आहे. यावेळी डॉ. कुणाल खेमनार यांनी पुष्पगुच्छ देवुन त्यांचे स्वागत केले, पुणे महानगरपालिका अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) पदाचा पदभार पृथ्वीराज बी.पी यांनी स्वीकारल्यानंतर त्यांनी सांगितलं की पुणे महानगरपालिकेत काम करण्याची उत्तम संधी मिळाली आहे. सगळ्यांना बरोबर घेवुन काम करणार आहे. याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) रवींद्र बिनवडे यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. डॉ. कुणाल खेमनार यांचा कालावधी पूर्णता हुन बराच कालावधी झाला होता. अखेर सरकारने त्यांची बदली केली आहे. डॉ. खेमनार यांची सरकारने साखर आयुक्त पुणे या ठिकाणी बदली केली आहे. त्यामुळे डॉ. खेमनार हे पुण्यातच राहणार आहेत. डॉ. खेमनार यांची जागा रिक्त झाल्यानंतर राज्य सरकारने पुणे महापालिकेला तात्काळ नवे अतिरिक्त आयुक्त दिले आहेत. सरकारने पृथ्वीराज बी.पी यांची पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती केली आहे. पृथ्वीराज बी.पी यांनी लातूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून उत्कृंष्ट सेवा बजावली होती. त्यानंतर नागपूर स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे.


0 Comments