पोलीसवाला नवरा असून तिने फसवले, पोलीस कॉन्स्टेबलने तिच्या प्रियकरांच्या डोक्यातच गोळ्या झाडून संपवले, वाळुज एम.आय.डी.सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी :- वाळुज एम.आय.डी.सी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील सातापूर शिवारांत पोलीस पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून एका व्यापाऱ्याच्या डोक्यात गोळी झाडून खून केल्याची तक्रार एम.आय.डी.सी वाळूज पोलीस ठाण्यात दिनांक १७ मार्च रोजी दाखल होती. धक्कादायक माहिती म्हणजे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या निलंबित पोलीस हेडकॉन्स्टेबल रामेश्वर सिताराम काळे यांने लक्ष्मण जगताप या साथीदारांसह व्यापारी सचिन साहेबराव नरोडे यांना डोक्यात गोळ्या झाडून संपवल्याची घटना वाळुज एम.आय.डी.सी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली होती. आरोपीं पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर सिताराम काळे यांच्यासोबत अजूनही एका साथीदाराला पोलिसांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने ताब्यांत घेतले आहे. आरोपी पोलीस हेडकॉन्स्टेबल रामेश्वर काळे हा मागील दिवसापासून व्यापारी सचिन साहेबराव नरोडे यांच्या मार्गावर चांगलाच होता. पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर काळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका कारवाईमध्ये निलंबित करण्यात आला होता तर त्याच्यावर ३५४ प्रमाणे छेडछाडीचा देखील गुन्हा ग्रामीण पोलीस दलात दाखल झालेला आहे. याप्रकरणी आरोपी पोलीस हेडकॉन्स्टेबल रामेश्वर काळे साथीदार लक्ष्मण जगताप यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.१७ मार्च रोजी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारांस एका अज्ञात व्यक्तीने व्यापारी सचिन साहेबराव नरोडे यांच्यावर गोळीबार केला वाळुज परिसरांतील साजापूर शिवारात डोक्यात बंदुकीची गोळी झाडून त्यांचा खून केल्याची तक्रार वाळुज एम.आय.डी.सी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तेव्हापासून गुन्हे शाखा आणि वाळुज पोलीस असे पाच पथके आरोपींच्या शोधात होती.


0 Comments