LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाचे घेतले दर्शन

सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाचे घेतले दर्शन, कायदा  व सुव्यवस्था राखत शिंगणापूरची यात्रा पार पाडावी : जितेंद्र डूडी जिल्हाधिकारी

संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी. सालाबाद प्रमाणे माण तालुक्यांतील शिखर शिंगणापूर या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते. या यात्रेंस महाराष्ट्रसह इतर राज्यांतूनही भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणावर येत असतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखत शिखर शिंगणापूरची यात्रा पार पाडण्याचे आवाहन सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी नुकतीच केले आहे. शिखर शिंगणापूर शंभू महादेवाचे दर्शन घेवुन जिल्हाधिकाऱ्यांनी यात्रेच्या पूर्वस्येला साधून नियोजित बैठकीत बोलत होते. तसेच सध्या लोकसभा निवडणुकीचा कालावधी आणि आचारसंहिता लागू असल्यांने याच अनुषंगाने त्यांनी माण खटाव च्या पोलीस तसेच महसूल प्रशासनाला कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या सूचना दिल्या आणि वेगवेगळ्या विभागाला योग्य ती जबाबदारीही वाटून दिली आहे. या बैठकीला स्वतः जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी माण खटाव चे उपविभागीय अधिकारी उज्वला गाडेकर मॅडम फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले-पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी शेडगे मॅडम स.पो.नि.अक्षय सोनवणे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांसह शिखर शिंगणापूर ग्रामपंचायतीसह परिसरांतील नागरिकांची बहुसंख्येने यावेळी उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments