LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

व्यापाऱ्यांवरील व गाळेधारकांवरील अतिक्रमणाचा अन्याय थांबवा - भगिरथ भालके

 


आषाढी यात्रेनिमित्त स्थानिक व्यापाऱ्यांवरील अन्याय थांबवा अन्यथा चक्काजामचा इशारा

पंढरपूर शहरांमध्ये आषाढी यात्रेच्या निमित्ताने गरीब व गरजू स्थानिक व्यापाऱ्यांना अतिक्रमणाच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांना हातगाडी धारकांना चालू असलेल्या नाहक त्रासाबद्दल श्री भगिरथदादा भारत भालके यांनी प्रांताधिकारी यांना सध्या चालू असलेल्या अतिक्रमणाबाबत व्यापाऱ्यांना त्रास होत असल्याने त्रास थांबविण्याबाबत चर्चा करून निवेदन दिले.

आषाढी यात्रेचा पंढरपूर शहरांमध्ये सध्या दिनांक ५-७-२०२४ पासून आज तागायत पंढरपूर येथील विविध ठिकाणाचे काही हातगाडे असतील, हातगाडे चालविणाऱ्या काही महिला भगिनी असतील या सर्वांचे पोट या आषाढी वारीच्या कालावधी मध्ये चालत असल्याने पंढरपूर नगरपालिकेचे संबंधित सर्व अधिकारी यांनी स्थानिक लोकांचा जाणून बुजून व्यवसाय करण्यास अडथळा निर्माण केला,जर का येत्या पुढील काळात जाणून-बुजून त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही रस्त्यावरती उतरून चक्काजाम करू असे श्री भगीरथ भालके म्हणाले,यावेळी आजी माजी नगरसेवक, व्यापारी बंधू-भगिनी व सहकारी मित्र उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments