LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

खामक्या पोलिस अधिकारी गजानन जाधव पुन्हा बीडमध्ये

 


           बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील रहिवासी असलेले गजानन जाधव चिखली येथे शिक्षण घेऊन पोलीस प्रशासन सेवेमध्ये रुजू झाले. पोलीस प्रशासनाचे खामक्या अधिकारी म्हणून ओळख असणारे  दरोडा प्रतिबंध पथप्रमुख म्हणून बीडमध्ये काळ गाजवणारे सपोनि गजानन जाधव हे परत बीड जिल्ह्यात आले असून मांजरसुभा महामार्ग पोलीस  चौकीचे प्रमुख म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. एक चांगला अधिकारी आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. सापोनी गजानन जाधव यांनी बीड शहर पोलीस ठाणे प्रमुख ,दरोडा प्रतिबंध पथक प्रमुख म्हणून गजानन जाधव यांनी केलेले काम जिल्हावासी विसरलेले नाहीत .एक खामक्या अधिकारी म्हणून जाधव यांनी आपली ओळख निर्माण केली त्यानंतर त्यांनी येथून छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस ठाण्यात बदली झाली होती .परत ते बीड जिल्ह्यात आले असून महामार्ग पोलीस चौकी मांजरसुंभाच्या प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली आहे त्यांनी पदभार स्वीकारला आहे त्यावेळी त्यांचे पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे, पोलीस अमलदार खताळ, दुधाळ ,पाईकराव मुंडे, सोनवणे यांनी स्वागत केले आहे .मांजरसुंभा महामार्ग पोलीस चौकी हे महत्त्वाचे  ठिकाण असून इथून सोलापूर धुळे अहमदपूर अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग जातात. माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समितीचे अमरावती विभाग संघटक तसेच महाराष्ट्र पोलीस न्यूजचे चिखली तालुका अध्यक्ष सारंग महाजन यांनी गजानन जाधव बीडमध्ये रुजू झाल्याबद्दल यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच श्रीराम नागरी पतसंस्थेचे शाखा राजे संभाजी चिखली ब्रांच मॅनेजर श्री सिद्धार्थ धंदरे साहेब त्यांनी सुद्धा गजानन जाधव यांना बीड मध्ये रुजू झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments