संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) कोरेगांव तालुका हा राजकीय तालुका म्हणून चांगलाच ओळखला जातो, तालुक्याच्या ठिकाणी काम करण्यासाठी अनेक प्रशासकीय अधिकारी राजकीय नेत्यांच्या मार्गदर्शनात तालुक्यांत पदस्थापना मिळवतात असे चित्र सध्या तालुक्यांतून दिसून येत आहे, कोरेगाव तालुक्यांचे सध्याचे प्रांत अधिकारी अभिजीत नाईक बुलढाणा जिल्ह्यातून ऐतिहासिक जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळण्यासाठी जिल्ह्यात रुजू झाले असून कोरेगांव प्रांताधिकारी तत्कालीन आणि कर्तव्यदक्ष सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या ज्योती पाटील मॅडम यांच्या बदलीनंतर कोरेगाव प्रांताधिकारी म्हणून अभिजीत नाईक यांनी पदभार घेतल्यापासून त्यांच्या कामावर मागील काही दिवसांपासून कोरेगांव तालुक्यांच्या जनतेतून अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. जिल्ह्यामध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरू होते. यावेळी देखील प्रांताधिकार्यामुळे अडचण निर्माण झाली होती, तसेच अनेक त्यांच्या तक्रारी समोर आहेत.पत्रकारांना न वेळ देता, त्यांना बाहेर थांबवणे, आणि आपल्या मर्जींतील तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना प्रथम प्राधान्य या प्रांत अधिकाऱ्यांकडूंन दिसून येत आहे, त्यामुळे आता जिल्हाधिकारी साहेब तालुक्यांच्या जनतेतून कोरेगांव तालुक्यांचे प्रांत अधिकारी हे जनतेसाठी आहेत की? राजकीय नेत्यांसाठी आहेत असा सवाल आता उपस्थित होत आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रांत अधिकाऱ्यांच्या कारभारावर लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा या प्रांतांची बदलीची मागणी जनतेतून होऊ शकते.
0 Comments