LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

साताऱ्यात पोलीस कर्मचाऱ्यांवर कोयता हल्ला प्रकरण:- सातारा शहर आणि तालुका पोलिसांनी दोन आरोपींच्या आवळल्या मुसक्या,

 संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी सातारा मध्यवर्ती बस स्थानकांत दोन दिवसांपूर्वी कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस हवालदार दत्ता पवार यांनी रात्री दहाच्या सुमारांस बस स्थानकांतून तिघांना हटकल्याच्या रागांतून तेथे कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस हवालदारांवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना शनिवारी घडली होती. या हल्ल्यामध्ये दत्ता पवार हे पोलीस हवालदार गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात चार सुरू होते, त्यांची आता प्रकृती स्थिर आहे, या हल्ल्याची गंभीर दखल घेत अवघ्या काही तासांतच या प्रकरणातील दोघा आरोपींना ताब्यांत घेतले तर अन्य दोघे आरोपी आकाशवाणी झोपडपट्टी परिसरांतील युवक असल्याची माहिती समोर होती. पोलीस हवालदारावरच सशस्त्र हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली होती. घटनेच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी तातडीने गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या पथकांला पाचारण केले होते. कोयता हल्ला प्रकरणाचा तपास सुरूच होता. यामध्ये आणखीन दोन आरोपींना सातारा शहर,तालुका पोलीस ठाणे,स्थानिक गुन्हे शाखा,वाहतूक नियंत्रण शाखा,पोलीस मुख्यालयातील ०३ आर.सीपी अशा पथकांतील सर्वांनी या कारवाईत सहभाग घेवुन दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. रोहन विलास थोरात (वय 20) रा. मतकर कॉलनी सातारा) प्रथमेश सुनील साळुंखे (वय 20) रा. आव्हाडवाडी दिव्यनगरी सातारा) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यांतून विना नंबर प्लेटच्या १५ मोटरसायकली ताब्यांत घेवुन त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम प्रमाणे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११०/११७ एम.व्ही ॲक्ट प्रमाणे कारवाई केली आहे. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी राजू नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के पोलीस निरीक्षक निलेश तांबे शाहूपुरी स.पो.नि. श्रद्धा आमले स.पो.नि. अभिजीत यादव पोउनि कुमार ढेरे पोउनि अमित पाटील यांच्यासह शाहूपुरी सातारा शहर स्थानिक गुन्हे शाखा सातारा तालुका पोलीस मुख्यालय आदीं पोलीस अधिकारी कर्मचारी अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments