संभाजी पुरीगोसावी (जळगांव जिल्हा ) प्रतिनिधी. जळगाव पोलीस दलामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या झाल्या असून,यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्याही कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, नवीन आलेल्या कर्मचाऱ्यांनी जोरदार कामगिरी करीत जिल्ह्यातील आठ गुन्हे उघडकीस आणले आहेत, यामध्ये सायकल चोर,कार चोर मोटरसायकल चोर, तसेच गावठी कट्टा बाळगणारा आरोपी डिझेल चोरी करणारी टोळी रस्त्यात अडवून रोकड लांबविणारी पैशाची बॅगेची चोरी अशा गुन्ह्यांची स्थानिक गुन्हे शाखेच्या नवीन टीमने गुन्हे उघडकीस आणले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे, अजिंठा चौफुली ते आकाशवाणी चौक परिसरांत महागड्या गाड्या संशयास्पद फिरत होत्या, त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने वाहनांच्या हालचालीवर लक्ष ठेवून ही कारवाई केली आहे, (मजहर रशीद पिंजारी (वय 43) रा. सल्लानगर जळगांव) असे आरोपींचे नाव आहे, सदर आरोपींवर दिल्ली येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे, सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते एलसीबी चे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे गणेश वाघमारे पो. कॉ. विनोद पाटील गजानन देशमुख मुरलीधर धनगर संदीप चव्हाण ईश्वर पाटील प्रदीप चौरे दीपक चौधरी यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता, तसेच या कामगिरीबद्दल एलसीबी च्या टीमला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी 1.0000 रुपये रोख बक्षीस जाहीर केले आहे,
0 Comments