विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांची मुंबईला बदली
संभाजी पुरीगोसावी (नागपूर जिल्हा) प्रतिनिधी. नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी राज्य गुन्हे अभिलेख विभागाचे पोलीस महानिरीक्षक डी. के दिलिप पाटील भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली होती, यासंदर्भात राज्य गृह विभागाने सोमवारी आदेश जारी केले होते, तर मावळते विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांची कायदा व सुव्यवस्था विशेष पोलीस महानिरीक्षकपदी मुंबई येथे बदली झाली आहे, तर नागपूरच्या पोलीस उपायुक्त अश्वती दोरजे मॅडम नागरी हक्क संरक्षणाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून मुंबईत बदली झाली आहे, गृह विभागाने जवळपास सोमवारी 10 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या, यामध्ये मुंबई,पुणे,नागपूर आतील अधिकाऱ्यांचा समावेश होता, नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील हे सन 2003 तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत, त्यांनी बुलढाणा यवतमाळ गोंदिया पोलीस अधीक्षक तर नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून देखील काम पाहिले आहे, सध्या राज्य गुन्हे अभिलेख विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून काम पाहत होते, डॉ .दिलीप भुजबळ पाटील हे शेतकरी कुटुंबातील आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यांतील आळेफाटा येथील रहिवाशी आहेत, सर्वसामान्य माणसाला प्रथम न्याय देण्याचा प्रयत्न राहणार आहे, जातीय सलोखा कायम राहील आणि लोकांशी पोलिसांचे संबंध वृद्धीगत करून त्या अधिक सक्षम करण्यावर आपला भर राहणार असल्यांचे त्यांनी प्रसार माध्यमांतून सांगितले आहे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी आपल्या पदाचा पदभार मावळते विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्याकडूंन स्वीकारला आहे, यावेळी मावळते विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थित डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांचे स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या,
0 Comments