दिनांक:- ११ जुलै २०२४
NEET परिक्षा घेणारी NTA संस्था रद्द करावी, व पुन्हा परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी सोलापूर शहर विद्यार्थी काँग्रेसचे (NSUI) शहरअध्यक्ष नागेश म्याकल, सचिव विजय बोगा, गोविंद चिंता, शुभम एक्कलदेवी, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, साहिल पल्ली, योगेश मार्गम आदींच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हधिकारी सोलापूर सोपान टोंपे यांना निवेदन देऊन केली.
या निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आली की, वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या NEET परीक्षेत झालेला गैरप्रकार हा भारताची नाचक्की करणारा आणि देशाच्या विश्वासार्हतेला तडा देणारा आहे. दिवसरात्र अभ्यास करुन परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखों विद्यार्थ्यांवर हा मोठा अन्याय करणारा आहे. यास जबाबदार असणाऱ्या NTA संस्था रद्द करून पुन्हा परीक्षा घ्यावी, दोषींची CBI मार्फत चौकशी करून कठोर कार्यवाही करावी. आणि लाखो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
0 Comments