LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

आंतरजातीय विवाह: मुलीच्या वडिलांनीच पुसले मुलीचे कुंकू नव्या जावयाला संपवले, संभाजीनगर जिल्ह्यात सैराट ची, पुनरवृत्ती..!

(छ.संभाजीनगर) संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी. महाराष्ट्र राज्याने पुरोगामी विचारांचा आपलंसं केले आहे, पण तरीही राज्यांत काही घटना अशा घडतात त्यावर आपले देखील मन हेलावून जाते, अशीच एक घटना संभाजीनगर मध्ये घडली आहे, आंतरजातीय प्रेम विवाह केला म्हणून वडिलांनी आणि चुलत भावाने मुलीचे कुंकू पुसले आहे, यामध्ये नव्या संसाराची सुरुवात करणाऱ्या जावयाला संपवले आहे, विद्या व अमित यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद म्हणजे प्रेमाचा विजय झाल्यांचे पाहायला मिळत होते, लहानपणापासून जी बाल मैत्रीण होती, तिच्यासोबत लग्न झाले, या आनंदाची भावना केवळ एक महिन्यांत चिरडली गेली कारण होते, या दोघांचा आंतरजातीय विवाह होतो, विद्या ही बौद्ध समाजाची होती, तर अमित गोंधळी समाजाचा होता, अमितच्या घरच्यांनी दोघांचे लग्न मान्य केले होते, मात्र विद्येच्या वडिलांनी आणि भावाने लग्न प्रतिष्ठेचं केलं आणि अमितची हत्या केली, अमितची आई म्हणजे माझ्या मुलाने फक्त प्रेमच केलंय प्रेम करण्याचा अधिकार नव्हता का? असा सवाल आता या माऊलीने केला आहे, विद्या आणि अमित एकाच इंदिरानगरचे रहिवासी होते, दोघेही बालपणीचे मित्र कवळ्या वयातच मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले,या दोघांनी पळून जावुन पुण्यात विधिवत लग्न केले होते, अमितच्या घरच्यांचा पाठिंबा मिळाल्याने ते परत आले होते, लग्नाला एकच महिना झाला असतानाच 14 जुलै रोजी अमितवर भर चौकात हल्ला झाला होता, यावेळी विद्याने पोलिसांना संरक्षण मागितले होते, मात्र पोलिसांनी दोन्ही कुटुंबीयांना समज दिली होती, विद्या आणि अमित यांच्या लग्नाला ग्रहण लागले ते म्हणजे जातीच्या किनाऱ्यामुळे विद्याचे वडील आणि भावाने अमितवर हल्ला केला त्यावेळी त्यांना हे भान राहिले नाही का?  विद्येच्या उभ्या आयुष्याचं काय होईल विद्यालाही त्यांना संपवायचं आहे हे प्रश्न पुरोगामी महाराष्ट्रांत अनुत्तरित आहेत आणि राहतील, अमितच्या मृत्यूनंतर त्यांचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत, फरार आरोपींना तातडीने अटक करा, अशी मागणी केली आहे. नातेवाईकांकडून जवाहरनगर पोलीस ठाण्यात या आंदोलन करण्यात आले पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments