संभाजी पुरीगोसावी (पिंपरी-चिंचवड ) प्रतिनिधी. पिंपरी चिंचवड पोलीस सहआयुक्त पदी शशिकांत महावरकर यांची नियुक्ती करण्यात आली होती, अखेर त्यांनी शुक्रवारी सकाळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात हजर राहून सह पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे, यावेळी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी त्यांचे स्वागत केले, शशिकांत महावरकर यापूर्वी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत होते, मागील काही दिवसांपूर्वी चुकीच्या पद्धतीने झालेल्या बदलीबाबत शासन देखील नरमले होते, अखेर शासनाकडूंन त्यांना बदली निवडीचे पसंती सांगण्याबद्दल चार वेगवेगळे पर्याय दिले होते, त्यानुसार त्यांनी पिंपरी चिंचवड पोलीस सह आयुक्त या पदाला चांगलीच पसंती दिली होती, अखेर त्याच पदावर शासनाने देखील त्यांच्या पसंतीला अखेर मान्यता दिली, पिंपरी चिंचवडचे पोलीस सह आयुक्त डॉ.संजय शिंदे यांची गुन्हे अन्वेषण विभाग येथे विशेष पोलीस महानिरीक्षक पदी बदली झाली होती, त्यानंतर हे पद रिक्त होते, मागील काही दिवसांपूर्वीच राज्यांतील भारतीय पोलीस सेवेतील चार अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या, अखेर पिंपरी चिंचवड पोलीस सह आयुक्त या पदावर शशिकांत महावरकर यांना पदस्थापना देण्यात आली, त्यांच्याकडे गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे,
0 Comments