महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार व माजी केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. सुशीलकुमारजी शिंदे साहेब खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारी संदर्भात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या अध्यक्षेखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक काँग्रेस भवन सोलापूर येथे संपन्न आयोजित केली होती.
या बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी दोन मतदारसंघातून निवडून येऊन संसदेत विरोधी पक्षनेते झाल्याबद्दल, प्रणितीताई शिंदे खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव अँड केशव इंगळे यांनी मांडला त्यास हसिब नदाफ यांनी अनुमोदन दिले.
तसेच अनेक विषयावर चर्चा झाली. पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना माजी आमदार प्रकाश यलगुलवार म्हणाले की, भाजपने अनेक जूमले दाखविले तरीही जनतेने सुज्ञपणे चारसो पार म्हणणाऱ्या भाजपला त्यांची जागा दाखवून दिली. देशाचे महान नेते सुशीलकुमार शिंदे साहेब, प्रचंड जनसंपर्क असणाऱ्या लोकांचे कामे करणाऱ्या नवनिर्वाचित खासदार आपल्यासोबत आहेत. लोकसभेत जनता जनार्दनच्या आशीर्वादाने विजयी झालो त्यामुळे गाफील न राहता विधासभेच्या लढाई साठी सज्ज रहा त्यामुळे जनसंपर्क वाढवा कष्ट करा, श्रम करा श्रमाचे रूपांतर विजयात होते.
यावेळी बोलताना अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांच्या ऐतिहासिक विजयाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवी उमेद आणि ऊर्जा निर्माण केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी बूथ स्तरापासून पक्षाला मजबूत करणे, विधानसभा मतदारसंघातील छायाचित्र मतदार यादी पुनरिक्षण, मतदार जनजागृती, जनतेच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आगामी काळात आंदोलन करणे, जनसेवा कार्य आणि विकासकामे आणखी प्रभावीपणे राबवणे तसेच काँग्रेसचा विकास, एकता, सर्वधर्मसमभाव, प्रगती, पक्ष बांधणी, प्रत्येक बुथवर BLA ची नेमणूक करणे, आरक्षणाचा आणि सद्भभावनेचा, संविधान रक्षणाचा विचार घरोघरी रुजवण्यावर भर दिला पाहिजे. पुढील तीन महिन्याचा निवडणुकीचा काळ आपल्या सर्वांसाठी संघर्षपूर्ण आहे. पण आपण सारे जण एकत्र काँग्रेसचे लोकवादी विचार घराघरात पोहोचवू. दिल्लीची लढाई जिंकली आहे. कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार मतदारसंघाची मागणी करणार असून जिथे मतदान कमी झाले आहे त्या ठिकाणी लक्ष देऊन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या, महविकास आघाडीच्या विजयाची पताका विधानसभेवर फडकावणारच, त्यासाठी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकतीने लढणार त्याची तयारी सुरु असून शेकडो समर्पित कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.
या बैठकीस शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे , माजी महापौर आरिफ शेख, अलकाताई राठोड, सुशिलाताई आबुटे, मा. नगरसेवक तौफिक हत्तूरे, परवीन इनामदार, अनुराधा काटकर, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अंबादास बाबा करगुळे, प्रदेश सरचिटणीस सुभाष चव्हाण, दत्तु बंदपट्टे, रवी यलगुलवार, राजेंद्र कलंत्री, कोमोरो सय्यद, हरून शेख, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, उदयशंकर चाकोते, बाबुराव म्हेत्रे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, प्रवक्ते नागनाथ कदम, बेरोजगार सेलचे अध्यक्ष रुपेश गायकवाड, उद्योग सेलचे पशुपती माशाळ, विद्यार्थी संघटना अध्यक्ष नागेश म्याकल, बसवराज म्हेत्रे, NK क्षीरसागर, अशोक कलशेट्टी, अँड केशव इंगळे, शकील मौलवी, हासिब नदाफ, अनिल मस्के, सागर उबाळे, परशुराम सतारेवाले, शफी हुंडेकरी, सुमन जाधव, हेमाताई चिंचोलकर, लखन गायकवाड, चक्रपाणी गज्जम, नूर अहमद नालवर , रफिक इनामदार, शिवशंकर अंजनाळकर, वसिष्ठ सोनकांबळे, ज्ञानेश्वर जाधव, संजय गायकवाड, पंडित बुबा गणेशकर, सुभाष वाघमारे, इरफान शेख, शिवाजी साळुंखे, रजाक कादरी, शशिकांत जाधव, सायमन गट्टू, सुबोध सुतकर, तोसिफ शेख, श्याम केंगार, शोभा बोबे, संघमित्रा चौधरी, लता गुंडला, रेखा बिणेकर, वीणाताई देवकते, मुमताज तांबोळी, लता सोनकांबळे, धैर्यशील बाबरे, शुभांगी लिंगराज, राजेश झंपले, गंगाधर शिंदे, शिरीष दळवी, प्रमोद शिंदे, रुकैय्या बिराजदार, हालिमा शेख, बसवराज प्रचंडे, सुनील डोळसे, गुंडू धुत्तरगी, संजय अलकुंटे, मकबूल शेख, दत्तात्रय इंगळे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments