आयएएस अधिकारी डॉ .पूजा खेडकर यांची पुण्यातून थेट वाशिमला बदली, खेडकर कुटुंबाला आयएएस अधिकाऱ्याची परंपरा
संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील थाटामाटात राहणाऱ्या परिविक्षाधीन असणाऱ्या सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. पूजा दिलीप खेडकर यांची पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ . सुहास दिवसे यांनी दिलेल्या मुख्य अप्पर सचिवांकडे दिलेल्या तक्रारीनंतर अखेर डॉ. पूजा खेडकर वाशिम जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून तडकाफडकी बदली करण्यात आली आहे, विशेष म्हणजे आयएएस अधिकारी डॉ. पूजा खेडकर यांनी आपल्या खाजगी गाडीवर म्हणजेच आडीवर लाल-निळे दिवे आणि व्हीआयपी नंबर प्लेट असलेली कार वापरली तसेच खाजगी गाडीवर महाराष्ट्र शासन असा फलक देखील लावला होता, खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे व्हीआयपी नंबरप्लेट असलेली अधिकृत गाडी निवास व्यवस्था पुरेसा कर्मचारी वर्ग आणि हवालदार असलेले अधिकृत खोली अशा मागण्या देखील केल्या होत्या, नियमानुसार परिविक्षाधीन अधिकाऱ्याला वरील सुविधा पुरवल्या जात नाहीत, आणि त्याला प्रथम राजपत्रित अधिकारी म्हणून नियुक्त करणे आवश्यक आहे, तसेच डॉ. पूजा खेडकर यांनी वरिष्ठ अधिकारीची केबिन बळकावल्याचा देखील आरोप करण्यात आला होता याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ .सुहास दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे तक्रार केली होती, आयएएस अधिकारी डॉ. पूजा दिलीप खेडकर यांना 3 जून 2024 पासून प्रोबेशनचा कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पाठवण्यात आले होते, अखेर पुण्यात थाटामाटात राहणाऱ्या परिविक्षाधीन आयएएस अधिकारी डॉ. पूजा खेडकर यांची अखेर वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे,
0 Comments