संभाजी पुरीगोसावी (नागपूर जिल्हा) प्रतिनिधी. प्रियकरांने लग्नांचे वचन देवुन दुसऱ्याच तरुणीशी लग्न केल्यामुळे याच नैराश्यांतून गेलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस प्रशिक्षण केंद्रात गळफास घेवुन आपले जीवन संपवले आहे, ही खळबळजनक घटना नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात उघडकीस आली आहे, प्रतीक्षा आदिनाथ भोसले (वय 28 बारामती पुणे जिल्हा ) असे या मृत महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे, या घटनेमुळे प्रशिक्षण केंद्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, शहरांतील पोलीस प्रशिक्षण केंद्र जवळपास १२०० महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू होते, नुकताच क्रिकेट पटू कपील देवने या प्रशिक्षण केंद्राला भेट देवुन महिला पोलिसांचे मनोबल उंचावले होते, केंद्रात पुणे-बारामती येथील प्रतीक्षा भोसले ही तरुणी सुद्धा प्रशिक्षण घेत होती, प्रतीक्षेच्या प्रेम संबंधाची कहाणी तिच्या कुटुंबीयांना माहीत होती, तिने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला होता, प्रतीक्षाने आता नव्याने जीवन जगण्याची सुरुवात केली होती, तिने आपल्या प्रियकराकडे लग्नाची तयारी दर्शवली होती त्यासाठी पोलीस प्रशिक्षण पूर्ण होताच लग्न करण्याचा निर्णय देखील घेतला होता, मात्र प्रियकर हा दगाबाज निघाला त्यामुळे प्रतीक्षाने आपली जीवन यात्रा संपवली अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे, या प्रकरणी बजाजनगर पोलिसांना प्राचारण करण्यात आले, पोलिसांनी पंचनामा करुन आकस्मिंत मृत्यूची नोंद करण्यात आली,
0 Comments