संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. जावली तालुक्यांचे मुख्यालय असलेल्या मेढा पोलीस ठाणे हे खमक्या अधिकाऱ्यांनी चांगलेच गाजलेले पोलीस ठाणे म्हणून जिल्ह्यात चर्चेत आहे, या पोलीस ठाण्याच्या इतिहासांत अनेक तत्कालीन प्रभारी अधिकाऱ्यांनी आपली उत्कृंष्ट सेवा दिली आहे, जावली तालुक्यांच्या मेढा पोलीस ठाणेस मानांकन देखील प्राप्त करून देण्यात मोठे योगदान ठरले होते, सध्याचे कार्यरत असणारे मेढा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. संतोष तासगांवकर यांनी देखील पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून अनेक गंभीर गुन्हे देखील उघडकीस आणून पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले, त्यांची सोलापूर येथे पोलीस निरीक्षक पदोन्नती झाली असुन, स.पो.नि. संतोष तासगांवकरांनी सातारा जिल्हा पोलीस दलात विविध पोलीस ठाण्यात उत्कृंष्ट सेवा दिली, पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जनतेशी जनसंपर्क वाढवून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले, तसेच गुन्हेगारीवर देखील त्यांनी चांगलाच आळा घातला होता, दहिवडी,मेढा स्थानिक गुन्हे शाखा अशा विविध ठिकाणी त्यांनी काम पाहिले होते, त्यांच्या रिक्त जागेवर नव्याने जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशावरुन स.पो.नि. पृथ्वीराज ताटे यांची मेढा पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांनी यापूर्वी ठाणे एलसीबी आणि पुणे ग्रामीण विभागातील नारायणगांव पोलीस ठाण्यासह विविध ठिकाणी उत्कृंष्ट काम पाहिले आहे, लोकसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये पुणे ग्रामीण पोलीस दलातून सातारा जिल्हा पोलीस दलात त्यांची पोस्टिंग झाली होती, यापूर्वी ते स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत होते, स.पो.नि. पृथ्वीराज ताटे यांनी शनिवारी मेढा पोलीस ठाण्याचा पदभार सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर यांच्याकडूंन स्वीकारला आहे,
0 Comments