संभाजी पुरीगोसावी (नवी मुंबई) प्रतिनिधी. नवी मुंबई पोलीस दलातील दोन दिवसांपूर्वी परिमंडळ -१ व परिमंडळ -२ अंतर्गत अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या पोलिसी सेवेच्या मुदत संपल्याने त्यांच्या तात्काळ बदल्या करण्यात आल्या आहेत, यामध्ये खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांची बदली करण्यात आली आहे, त्यांच्या रिक्त जागेवर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे यांची खारघर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे या खाकी वर्दीतील आपलेपणा जपणाऱ्या महिला अधिकारी म्हणून महाराष्ट्रांच्या पोलीस खात्यात त्यांची ओळख आहे, नवी मुंबई पोलीस दलातील विविध पोलीस ठाण्यात त्यांनी उत्कृंष्ट सेवा दिली आहे, त्यांच्याकडे आता खारघर पोलीस ठाण्याची नव्याने जबाबदारी देण्यात आली आहे, यामध्ये नेरूळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांची पनवेल शहर पोलीस ठाण्यात, तर रबाळे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नायकवडी यांची नेरूळ पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे, तसेच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांची वाशी पोलीस ठाणे येथे तर रबाळे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे यांची खारघर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे, यातील काही अधिकाऱ्यांनी आपला तात्काळ पदभार स्वीकारला आहे,
0 Comments