महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी भेट घेतली.
यावेळी पंढरपूर शहरातील नगरपालिका चालवत असलेल्या शाळांची अवस्था दयनीय झाल्या असून इमारती खराब झाल्या आहेत. सोयी सुविधा नाहीत.
त्या सर्व शाळा दुरुस्त करण्यासाठी दहा कोटी रुपये निधीची मागणी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी लेखी पत्राद्वारे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली.
यावेळी तात्काळ निधी मंजूर करण्याचे आदेश दीपक केसरकर साहेबांनी संबंधितांना दिले.

0 Comments