सोलापूर ग्रामीण चे नवनियुक्त पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्वीकारला पदभार... पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची उत्कृंष्ट सेवा, संभाजी पुरीगोसावी (सोलापूर जिल्हा ) प्रतिनिधी. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची पुणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागांच्या पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली असून, त्यांच्या जागी धाराशिव चे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली होती, आज नवनियुक्त पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे, मागील काही दिवसांपूर्वीच राज्य गृह विभागाने राज्यांतील 29 बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शासनांचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी काढले होते, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या कार्यकाळात चांगली यंत्रणा राबवून टीमवर्कने काम केल्यामुळे विविध कामे लक्षात राहणारी अशीच आहेत, पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी चोख नियोजन केले होते,त्यामुळे वारी अत्यंत यशस्वी सुरळीतपणे पार पडली, वारीच्या काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चिघळला होता, यावेळी सरदेशपांडे यांनी मराठा बांधवांनी समन्वय साधून चर्चा करून आंदोलन चिघळू दिले नाही, विविध तालुक्यांतील घोरफोडी मोटरसायकल चोरी, अवैध दारू विक्रीवर ही मोठ्या प्रमाणात कारवाई केल्या होत्या, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून 22 ऑक्टोंबर 2022 रोजी त्यांनी पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतली होती, त्यांच्या बदलीनंतर सोलापूर ग्रामीण ला देखील कर्तव्यदक्ष आणि सर्वांना सोबत घेवुन काम करणारा आयपीएस अधिकारी म्हणून अतुल कुलकर्णी यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे
0 Comments