वर्धा जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी स्वीकारला पदभार... पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांची वर्धा जिल्ह्यात उत्कृंष्ट सेवा, संभाजी पुरीगोसावी (वर्धा जिल्हा ) प्रतिनिधी. राज्यांतील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शासनांचे सह सचिव वेंकटेश भट यांनी काढले होते, यामध्ये वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांची मुंबई बल गट क्र. 11 येथे समादेशक म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागेवर आता नागपूर ( शहर ) पोलीस उपायुक्त अनुराग जैन यांना जबाबदारी देण्यात आली होती, 25 ( ऑक्टोंबर ) 2022 तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्याकडूंन पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी पदभार स्वीकारला होता, त्यांच्या कार्यकाळामध्ये देखील जिल्ह्यात चांगली यंत्रणा राबवून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले, वर्धा जिल्हा वासियांसोबत जनसंपर्क निर्माण करीत, वर्धा जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी अंमलदार तसेच अधिकाऱ्यांचे देखील चांगलेच सहकार्य मिळाले त्यामुळे जिल्ह्यात चांगले काम करता आले, वर्धा जिल्हा वासियांकडून भरभरून प्रेम मिळाले, बदली झाली तरी वर्धा जिल्हा वासियांच्या कायम संपर्कांत राहील अशा प्रतिक्रिया मावळते पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिल्या आहेत, मात्र वर्धा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून श्रीकृष्ण कोकाटे यांची नियुक्ती असल्याचे माध्यमांवर चांगलीच चर्चा रंगली होती, मात्र त्यांनी आपल्या नावाची अफवा असल्यांचे सांगितले होते, तरीही वरिष्ठांची परवानगी घेवुन रुजू होऊ शकतो असे नवनियुक्त पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनीही प्रतिक्रिया दिल्या होत्या, अखेर आज दुपारी वर्धा पोलीस मुख्यालयात हजर राहून त्यांनी मावळते पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे, नूतन पोलीस अधीक्षक अनुराग जैन हे 2016 तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत, कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांना पोलीस खात्यात ओळखले जात आहे,
0 Comments