पंढरपूर(प्रतिनिधी):- अखिल भारतीय मराठा महासंघाच्या विस्तारीकरणाचे जाळे पंढरपूर शहरात वाढत असून आज शहरातील नवीन कराडनाका येथे मराठा महासंघाच्या २१ व्या शाखेचे उद्घाटन मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाले.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष चव्हाण म्हणाले की, मराठा समाजातील युवकांची मोट बांधण्यासाठी तसेच समाजाचे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज एक संघ राहण्यासाठी तसेच शाखेच्या माध्यमातून समाज उपयोगी कार्यक्रम राबवून समाज बांधवांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी या शाखेच्या उपयोग होणार आहे.
मराठा महासंघाच्या माध्यमातून तसेच समाज बांधवांच्या हिताच्या अनेक योजना शासनामार्फत सुरू असून याचा लाभ समाजातील युवकांना मिळावा शिक्षणाच्या माध्यमातून देशाबरोबरच परदेशातही प्रवेशासाठी सहकार्य केले जाते. शैक्षणिक अडीअडचणी सोडविल्या जातात. समाज बांधवांच्या मूलभूत प्रश्नही या माध्यमातून सोडवून शाखेचे कार्य भक्कमपणे उभे केले जाते हे कार्य अविरतपणे सुरू असल्यानेच आज पंढरपूर शहरात २१ व्या शाखेचे उद्घाटन झाले आहे १०० शाखा काढण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे सोलापूर जिल्हा समन्वयक योगेश वाघ, युवक जिल्हाध्यक्ष शिवाजी मोरे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष हनुमंत कदम, जिल्हा सचिव विलासराव देठे सर, सहसचिव गुरुदास गुटाळ, जिल्हा उपाध्यक्ष सचिन गंगथडे, पंढरपूर तालुका अध्यक्ष संतोष जाधव, तालुका कार्याध्यक्ष विजय बागल,विजय डुबल,प्रदिप आसबे(पत्रकार),तालुका युवक संघटक प्रदिप मोरे, शिक्षक आघाडी तालुका उपाध्यक्ष सोमनाथ बागल, तालुका युवक आघाडी उपाध्यक्ष सुहास अण्णा नागटिळक, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष राज गायकवाड, शहराध्यक्ष अमोल पवार, काका यादव, शामराव साळुंखे, पांडुरंग शिंदे, अमर शिंदे, राहुल शिंदे,सोमा झेंड, रिक्षा संघटना शहराध्यक्ष नागेश गायकवाड, श्रीकांत माने, यशवंत बागल, सुनील इकारे,बाळू बंडगर,विजय चौधरी,विनायक पडवळे, तानाजी चौधरी, संतोष घाडगे मगरवाडी, राजेंद्र चव्हाण भोसे, मंगळवेढा तालुका अध्यक्ष सचिन डोरले, माऊली कोंडूभैरे, करमाळा तालुका अध्यक्ष लक्ष्मण गुटाळ, माळशिरस तालुका अध्यक्ष शामराव गायकवाड, शहराध्यक्ष अमोल पवार, संभाजी पवार, मंगळवेढा मालवाहतूक संघटनेचे महेश डोरले, नाना फंड, शहराध्यक्ष तानाजी दिवसे, अनिल मुदगुल,अजित लेंडवे, तालुका महिला तालुका अध्यक्षा रतनताई थोरवत, उपाध्यक्षा अर्चनाताई चव्हाण, शहर उपाध्यक्षा अश्विनीताई साळुंखे,नुतन शाखा अध्यक्ष निलेश शिंदे, उपाध्यक्ष मयुरेश डोंगरे,सचिव वैभव बागल, खजिनदार विशाल शिंदे, सदस्य दिगंबर चव्हाण,कपिल कोरके, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष नानासाहेब शिंदे, मार्गदर्शक सागर बागल, प्रशांत डोंगरे, छावा संघटनेचे अध्यक्ष मंगेश शिरसागर, शुभम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

0 Comments