LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर महिला काँग्रेसच्या वतीने पेट्रोल-डिझेल-एलपीजीच्या वाढत्या किमती, वाढती महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार यांच्या विरोधात "खर्चे पे चर्चा" मोहिमेची सोलापूर शहरात सुरुवात

सोलापूर महिला काँग्रेसच्या वतीने पेट्रोल-डिझेल-एलपीजीच्या वाढत्या किमती, वाढती महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार यांच्या विरोधात "खर्चे पे चर्चा" मोहिमेची सोलापूर शहरात सुरुवात

महागाई गगनाला भिडल्याने सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, भाज्या, धान्य सर्वांच्याच किंमती प्रचंड वाढल्या आहेत, घर चालवणे गृहिणींना कठीण झाले आहे. निवडणुकीच्या तोंडावर महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन भाजपा महिलांची फसवणूक करते. महागाईमुळे सण, उत्सावाचा रंग फिका पडला आहे. या महागाईने जनता त्रस्त आहे म्हणून भाजपा (BJP) सरकारला जाग आणण्यासाठी महिला काँग्रेसने राज्यभरात ‘खर्चे पे चर्चा’ अभियान राबवणार आहे, अशी माहिती महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसचे अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी शुक्रवारी दि. ०६ सप्टेंबर २०२५ रोजी टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अलका लांबा यांनी या मोहिमेची घोषणा केली होती त्या अनुषंगाने आज माजी केंद्रीय गृहमंत्री मा. सुशीलकुमार शिंदे साहेब व खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरचे प्रभारी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसचे महासचिव शीलाताई उंबरे पेंढारकर व प्रदेश काँग्रेस सचिव अलकाताई राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत खर्चे पे चर्चा मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला

 यावेळी शीला उंबरे पेंढारकर म्हणाले की महागाई प्रश्नी भाजपा सरकारला जाग आणण्यासाठी दिनांक १४ सप्टेंबर २०१४ पासून सोलापूर शहरातील विविध भागात जाऊन महिलांमध्ये जनजागृती करणार आहोत. तसेच भाजप सरकारमुळे वाढलेल्या महागाई बद्दल चर्चा करणार आहोत. सामान्य माणसाच्या महिलांच्या हक्कांसाठी लढण्याचा संकल्प या करून "खर्चे पे चर्चा" या अभियानाद्वारे घरोघरी पोहोचून गरिबांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू राहणार आहे. असे मनोगत व्यक्त केले

यावेळी माजी महिला अध्यक्ष अँड करीमुनिसा बागवान सुमनताई जाधव शोभा बोबे विणाताई देवकाते संगमित्रा चौधरी मुमताज तांबोळी चंदा काळे रुकीया बिराजदार मुमताज मदर शेख सलीम शेख अनिता भालेराव बबीता नाटके शहेनशाह मोमीन आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments