LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

अखिल भारतीय मराठा मेळावा पूर्व तयारी नियोजन बैठक संपन्न

 


अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पंढरपूर येथे दिनांक 29 सप्टेंबर रोजी श्रीयश पॅलेश कोर्टी, रोड पंढरपूर येथे संपन्न होणाऱ्या मराठा उद्योजक मार्गदर्शन मेळावा व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे प्रांतीय कार्यालय पंढरपूर येथे चालू करणे यासाठी, नियोजन बैठक संपन्न झाली. बैठकीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे अध्यक्ष मा .ना. श्री. नरेंद्रजी पाटील साहेब यांनी मेळावा उत्कृष्ट पार पाडावा यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या. पंढरपुरातील मेळावा हा सर्वात मोठा मेळावा व्हवा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. सदर बैठकीस अर्बन बँक पंढरपूरचे व्यवस्थाप- विरदे साहेब, लोक मंगल बँकेचे व्यवस्थापक - राजसिंह पारस साहेब व दरेकर साहेब तसेच निशिगंधा सहकारी बँकेचे व्यवस्थापक -कैलास शिर्के साहेब यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. सदर बैठकीचे प्रास्ताविक प्रवक्ते सतीश धनवे सर यांनी केले. तर जिल्हाध्यक्ष मा.श्री.अर्जुनराव चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. सदर बैठकीस शिवसेना जिल्हाध्यक्ष- महेश साठे. सकल मराठा समाजाचे अध्यक्ष -किरण आप्पा भोसले. उद्योपती युपी बागल साहेब, शेलार साहेब, स्वराज्य जिल्हा प्रमुख - प्राध्यापक महादेव तळेकर सर, शेतकरी संघटना अध्यक्ष- छगन पवार, मा. सभापती विजयसिंह नाना देशमुख, फुल चिंचोलीचे डॉक्टर किलमिसे साहेब, वाघ साहेब, इत्यादी उपस्थित होते. तसेच महासंघाचे जिल्हा सचिव- गुरुदास घूटाळ, तालुकाध्यक्ष- संतोष नाना जाधव, विद्यार्थ्यी आघाडी जिल्हाध्यक्ष- हनुमंत कदम सर, शहराध्यक्ष -अमोल पवार, संघटक- काका यादव, रीक्षा संघटना अध्यक्ष- नागेश गायकवाड, मंगळवेढा तालुका अध्यक्ष- श्री. सचिन डोरले,  सचिन थिटे ,करमाळा तालुका अध्यक्ष- लक्ष्मण घूटाळ, सांगोला तालुका अध्यक्ष- रोहित शिंदे, माळशिरस तालुका अध्यक्ष- शामराव गायकवाड, पांडुरंग शिंदे, अमर शिंदे, आनंद शिंदे, संतोष पवार, दत्ता पवार, सचिन कदम, वाखरीचे पैलवान- चरण साळुंखे, रोहित शिंदे, समाधान देठे, प्रमोद कोडक व्यापारी आघाडी अध्यक्ष- नाना शिंदे अश्विनीताई साळुंखे, उपाध्यक्ष- विजय बागल, महिला जिल्हाध्यक्ष- प्रभावती गायकवाड, प्रा. रजनीताई जाधव, युवती जिल्हाध्यक्ष-अॅड. प्राजक्ता शिंदे, रतन थोरवत मॅडम, मंगळवेढा अध्यक्ष -रंजनाताई जाधव, नियोजन बैठकीस पंढरपूर मंगळवेढा येथील बहुसंख्य मराठा बांधव भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम बिस्किट सर यांनी केले व आभार शहराध्यक्ष- अमोल पवार यांनी केले.

Post a Comment

0 Comments