पंढरपूर दि .१५ सर्व शाखीय सोनार समाजाचे दैवत श्री संत नरहरीमहाराज सोनार यांचा ७३९ वा हरीऐक्य सायुज्य समाधी सोहळा श्री विठ्ठल मंदिरात मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.
भारतीय नरहरी सेना, श्री संत नरहरीमहाराज सोनार पुतळा व स्मारक समिती, सराफ सुवर्णकार संरक्षण समीती व पंढरपूर सोनार समाज यांच्या संयुक्त विध्यमाने आयोजन केले होते.
शनिवार १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी दहा वाजता श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर धर्माचार्य दत्तात्रय महाराज दहिवाळ यांचे हस्ते श्री संत नरहरींची मुर्तीभेट घडवून, तुळशी अर्पण करून संत नरहरींचा जयघोष करण्यात आला, तसेच नामदेव पायरी जवळ संत नरहरीमहाराज सोनार यांचे तैलचित्राचे पुजन करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या वेळेस भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बुराडे सोनार, समाज संस्था अध्यक्ष अरूणशेठ मंजरतकर, भारतीय नरहरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.राजेद्रजी पिंगळेसाहेब, प्रदेशाध्यक्षा अर्चनाताई दिंडोरकर, सराफ सुवर्णकार संरक्षण समीतीचे प्रदेशाध्यक्ष उमेशभाऊ बुऱ्हाडे, स्मारक समीतीचे प्रदेशाध्यक्ष अॅड विशालजी वेदपाठक, पंढरपूर सोनार समाज ट्रस्ट चे उपाध्यक्ष संजय ढाळे, माजी समाज अध्यक्ष हरिभाऊ लोळगे इंदापूरकर, हरिभाऊ बागडे, नागेश मंजरतकर, लंकेश बुराडे, रविंद्र टेम्भूर्णीकर, गुरुदेव अष्टेकर, मयूर शहाणे, आकाश बुराडे, कृष्णाशेठ राजूरकर, औदुंबर पोतदार, नानासाहेब गडगीळे, राजू अष्टेकर आणि असंख्य समाज बंधू आणि भगिनीं यावेळी मोठयासंख्येने उपस्थित होते.

0 Comments