सराफ सुवर्णकार व संलग्न व्यावसायिक यांच्या कडून बेकायदेशीर सोने रिकवरी करणार्या पोलिस अधिकार्यांचे त्वरित निलंबन करण्यात यावे आशी मागणी भारतीय नरहरी सेना प्रणीत सराफ सुवर्णकार संरक्षण समीतीचे प्रदेशाध्यक्ष उमेशभाऊ बुऱ्हाडे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांच्या कडे लेखी निवेदना द्वारे केली आसल्याची माहीती भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बुराडे यांनी प्रसार माध्यमांना दिली..
निवेदनात
महाराष्ट्र शासन निर्गमित जी आर क्र . व्हि आय पी ०७२३/ प्र क्र ९१ पोल १३ चे उल्लंघन पोलीस अधिकारी करत असून केवळ सोने रिकवरी साठी पदाचा आणी कायद्याचा गैरवापर करत सराफ सुवर्णकारांना धमकावून अनेक केस मध्ये अडकवण्याची भीती घालत बेकायदेशीर रीत्या सोने रिकवरी करणार्या व तसा प्रयत्न करणार्या भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांची अनेक प्रकरणे पुराव्यासह कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक साहेब यांना देण्यात आले आसून या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे त्वरीत निलंबन करण्याची मागणी सराफ सुवर्णकार संरक्षण समीतीचे प्रदेशाध्यक्ष उमेशभाऊ बुऱ्हाडे यांनी केली आहे
या वेळेस राज्य कार्याध्यक्ष तथा कायदेशीर सल्लागारअॅड विशालजी वेदपाठक उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गणेशशेठ टाक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जगदीशशेठ कांबळे.
पुणे जिल्हाध्यक्ष प्रथमेशशेठ नगरकर.अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष ओकांरशेठ गटगिळे. तालुकाध्यक्ष हितेशशेठ पंडीत गणेशशेठ मैड.पुणे जिल्हा संपर्क प्रमुख उमेशशेठ बागडे सोमनाथ अवताडे सह सराफ सुवर्णकार बांधव उपस्थित होते
0 Comments