पंढरपूर दि २०..शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या नवीन पदाधीकारी निवडीची घोषणा झाली असून यात पंढरपूर विभागातून उपजिल्हा प्रमुखपदी काकासाहेब बुराडे यांची तर पंढरपूर शहर प्रमुखपदी युवराज गोमेवाडीकर यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीची माहिती मिळताच पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे,उपजिल्हा प्रमुख काकासाहेब बुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक २० एप्रिल रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे विविध पदाधिकारी व शिवसैनिक व महिला आघाडी यांनी एकत्र येत राजमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,महात्मा जोतिबा फुले,भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,माजी आमदार भाई राऊळ,स्वातंत्रवीर सावरकर आदींच्या पुतळ्यास अभिवादन केले.तर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. जून २०२२ मध्ये झालेल्या दुफ़ळीनंतरही आजही पंढरपुर शहर तालुक्यात जुना निष्ठावंत शिवसैनिक हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत असल्याचे सांगत मातोश्रीचा आदेश पाळत शिवसैनिकांनी नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून अभिनंदन केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख काकासाहेब बुराडे,तालुका प्रमुख बंडू घोडके,शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर, उपतालुका प्रमुख नागेश रितुण्ड, संजय घोडके मा उपशहरप्रमुख संजय ढाळे,नितीन थिटे,दिलीप उघाडे,सरपंच बळीराम देवकते,विजय बागल,हणमंत जाधव,बाळासाहेब रणदिवे,युवासेना उपतालुकाप्रमुख प्रणीत पवार,मा. शहर समन्वयक लंकेश बुराडे, जहाँगीर नदाफ,सलीम तांबोळी,अमोल (भैय्या)पवार,पवन बचुटे,आतिष खुळपे,बापु कदम, दत्तात्रय पाटील,अक्षय ढाळे,अक्षय गांडूळे,आकाश पवार, सैफन नदाफ,कृष्णा लवटे,अजय बदडे, विजय ढोले,रमेश मोरे,राहुल मोरे,शशी मोरे,सचिन खंकाळ,नवनाथ चव्हाण,राहुल गोमेवाडीकर,अमित पवार, प्रवीण शिंदे, रोहीत वाकडे,योगेश मिसाळ,मोहसीन शेख,सिद्धेश्वर केंदळे,गणेश सूर्यवंशी, विशाल पोफळे,हनुमंत पुजारी,शुभम ओतारी, सचिन चौगुले, महिला आघाडी मा. तालुका संघटिका संगीताताई पवार,सरवस्ती गोसावी,नंदिनी गायकवाड,ललिता सावंत,रुपाली पवार,अनिता आसबे,मंजुळा दोडमिसे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments