पंढरपूर, पै तेजेस भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त काल मोजै टाकळी लक्ष्मी गावा मध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य दाजी चंदनशिवे यांच्या शुभहस्ते नारळ झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले.या वेळी सुरज वाघमोडे, गणेश चंदनशिवे, आकाश भोसले, सोमनाथ देठे, अमर पुणेकर, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पै तेजेस भोसले हे बारा बलुतेदार व आलुतेदार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई किशोर भोसले यांचे जेष्ठ चिरंजीव आहेत. तर पै तेजेस भोसले हे बारा बलुतेदार व आलुतेदार संघटनेचे राज्य संघटक म्हणून राज्य भर काम करतात. भोसले हे मनमिळाऊ स्वभावाचे आहेत. ते हिरीरीने सामाजिक कार्यात सहभागी होतात. माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे विश्वासू कार्यकर्ते आहेत.
0 Comments