LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

महात्मा फुले युवा दलाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागावे – ॲड .सतिष शिंदे



पाटोदा (ता. बीड): महात्मा फुले युवा दलाची तालुका बैठक आज नायगाव, तालुका पाटोदा येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली.
या वेळी महात्मा फुले युवा दलाचे संस्थापक प्रमुख ॲड .सतिष शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.

या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी पुढे यावे. गोरगरिबांसाठी नवीन योजना पोहोचवाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. गावोगावी लोकांमध्ये राहून त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभागृहांमध्ये महात्मा फुले युवा दलाचे कार्यकर्ते निवडून गेले पाहिजेत असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

“महात्मा फुले युवा दल हे सामान्य जनतेसाठी लढणारी संघटना आहे आणि आता निवडणुकीच्या तयारीसाठी सज्ज व्हावे,” असे आवाहनही ॲड.सतिष शिंदे यांनी केले.

यावेळी महात्मा फुले युवा दलाचे बीड जिल्हा प्रमुख अजय शिंदे म्हणाले की, यापुढे महात्मा फुले युवा दल बीड जिल्ह्यातील गावागावात जाऊन समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील 

पाटोदा तालुका कार्यकारिणीच्या या बैठकीत सर्वानुमते गणेश मोहळकर यांची तालुका प्रमुख पदावर निवड करण्यात आली.

या बैठकीसाठी तालुक्यातील शिवाजी मोहोळकर, श्रावण मोहोळकर, दत्तात्रय मोहोळकर, साईनाथ मोहोळकर, आकाश मोहोळकर, यशवंत मोहोळकर, बाबासाहेब मोहोळकर (मा. सरपंच), बिभीषण मोहोळकर, दत्ता मोहोळकर, सोमनाथ मोहोळकर, विजय मोहोळकर, मंगेश वनवे, गणेश शेवाळे (पत्रकार), आकाश गर्जे, परमेश्वर मोहोळकर, अभिषेक मोहोळकर, कृष्णा मोहोळकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments