LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*माजी आमदार शिंदेच्या घरच काम नाही, शेतकऱ्यांना लाईट देणं हे महत्त्वाचे*- आमदार अभिजीत पाटील*जिल्हाधिकाऱ्यांकडे बसून प्रश्न मार्गी लावला; तर माजी आमदारांच्या पुत्रांचा मीच काम केल्याचा केविलवाणा प्रयत्न**(घोटी येथील ३३/११ के.व्ही. उपक्रेद्रचा भूमीपूजन संपन्न)*


प्रतिनिधी/- 

माढा तालुक्यातील घोटी येथे ३३/११ के.व्ही. उपक्रेद्रचा भूमीपूजन आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. घोटी येथे नवीन सबस्टेशनला जागा मिळत नसल्याने सोलापूर जिल्हाधिकारी यांचेकडे आमदार अभिजीत पाटील यांनी बसून प्रश्न मार्गी लावला आहे. 

गेल्या २०वर्षांपासून घोटी सबस्टेशनचा प्रश्न मार्गी लागला नाही आणि आम्ही विकास केला म्हणून केविलवाणा प्रयत्न केला जातोय, घोटीकरांनी अनेक वेदना सोसल्या असून आता विकासाचे राजकारण करू असे जिल्हा परिषदेचे सदस्य भारत शिंदे भाषणात व्यक्त झाले.

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेवर मी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो आहे तरी शिंदेंना अजून पराभवच मान्य नाही. माजी आमदारांच्या घरचे काम नाही तर शेतकऱ्यांना लाईट देणं ही लोकप्रतिनिधी म्हणून मी माझी भूमिका पार पाडत आहे. सिना- माढा विस्तारीत करून घोटी पुर्वभागात पाणी आणण्याचे पुढील काम हाती घेणार असल्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी यावेळी सांगितले. माजी आमदारांच्या पुत्राने मागील ५वर्षाची कामाची यादी जाहीर करावी. निधी किती आणला? व कोणती कामे केली अशी खोचक टिका आमदार पाटील यांनी केली. 

भारत व पाकिस्तानच्या युद्धामध्ये भारतीय सैन्याच्या पाठिमागे खंबीर उभे राहून आपल्या भारतीय सैन्याचे मनोबल वाढवून त्यांना प्रोत्साहित करण्याचा हेतू असल्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले. 

यावेळी जि.प.सदस्य भारत आबा शिंदे, शिवाजी आलट, हनुमंत बागल, सरपंच विजय पवार, रब्बी मुलाणी, भारत माळी, माणिक लांडे, बाळासाहेब ढेकणे, ॲड.अर्जुन बागल, वनवे, पोपट काळे, राजाभाऊ बागल, हनुमंत भोसले, अशोक देवकर, वाय.जी.भोसले, बंडू लामकाने, दिगंबर फाळके, अक्षय बागल, दत्तात्रय नरसाळे, शहाजी मुळे, अमर इंगळे, अशोक देवकर, अतुल शिरसाट, महावितरणचे पवार, जॅक्सन कंपनीचे रवी कुमार यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

घोटी गावचा कित्येक वर्षापासून सबस्टेशनचा रखडलेला प्रश्न नुतन आमदार अभिजीत पाटील यांनी मार्गी लावल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. माजी आमदारांनी गेल्या २५वर्षापासून आम्हाला विकासापासून वंचित ठेवले होते परंतू नवनिर्वाचित आमदार अभिजीत पाटील धडाकेबाज काम करत असल्यामुळे आम्ही सर्व आनंदात आहोत. - *संजय वणवे, मा.सरपंच* घोटी

Post a Comment

0 Comments