सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली "जरा याद करो कुर्बानी" 'जय हिंद' या संकल्पनेतून ऑपरेशन सिंदुर मध्ये भारतीय जवानांनी केलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी वीर जवानांना सलाम करण्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली.
*तसेच यावेळी भारतरत्न राजीव जी गांधी यांच्या पुण्यतिथी निम्मित त्यांच्या पुतळ्यास शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.*
यावेळी बोलताना चेतन नरोटे म्हणाले की, ‘ऑपरेशन सिंदूर ’ राबवून दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या भारतीय सैनिकांचा आत्मविश्वास बळकट करण्यासाठी, सैनिकांच्या विजयाचे कौतुक करण्याकरीता तसेच युद्धात मृत्युमुखी पडलेल्या शहिदांना मानवंदना देण्यासाठी जरा याद करो कुर्बानी हा कार्यक्रम काँग्रेस भवन सोलापूर येथे आयोजित आहे. तसेच भारतरत्न स्व. राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांनाही विनम्र अभिवादन करतो.
यावेळी अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, माजी महापौर आरिफ शेख, मा. नगरसेवक विनोद भोसले, मा. नगरसेविका फिरदौस पटेल, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, प्रा. नरसिंह आसादे, शकील मौलवी, भीमाशंकर टेकाळे, बाबुराव म्हेत्रे, नागनाथ कदम, सिद्धाराम चाकोते, हारून शेख, अंबादास गुत्तीकोंडा, बसवराज म्हेत्रे, रामसिंग आंबेवाले, अनिल मस्के, करीमुनिसा बागवान, शोभा बोबे, ज्योती गायकवाड, तिरुपती परकीपंडला, अशोक कलशेट्टी, सागर उबाळे, परशुराम सतारेवाले, मेघश्याम गौडा, नागेश म्हेत्रे, लखन गायकवाड, राजेश झंपले, भीमराव शिंदे, संजय गायकवाड, रफिक चकोले, नागनाथ शावने, मोहसीन फुलारी, चंदा काळे, मुमताज तांबोळी, रुकैयाबानू बिराजदार, चंद्रकांत नाईक, अभिलाष अच्युगटला, हाजी मेहमूद शेख यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
0 Comments