सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज मंगळवेढा तालुक्यातील शिरसी आणि गोणेवाडी या गावी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
तसेच ग्रामस्थांचे निवेदने ही स्वीकारून त्यांच्या अडचणी लवकरात लवकर सोडविण्याची ग्वाही दिली.
यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना म्हणाले मंगळवेढा तालुक्यातील २४ गावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील असून शासन याचा गांभीर्याने विचार करत नाही म्हणून शासनाचे विचार न करता चेन्नई येतील खाजगी संस्था यांच्यामार्फत मंगळवेढाच्या २४ गावांचा व उर्वरित सर्वच दुष्काळग्रस्त गावांचा विकास करण्यासाठी त्या संस्थेमार्फत काही गावात काम सुरू केले आहे. मंगळवेढ्याचा दुष्काळ संपवण्यासाठीच मी खासदार झाले असून लवकरात लवकर दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
यावेळी मंगळवेढा तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, युवक अध्यक्ष रविकरण कोळेकर, शिरशीचे सरपंच बाबासाहेब कसबे, माजी सरपंच पै. गायकवाड साहेब तसेच गोणेवाडी चे माजी सभापती संभाजी गावकरे सर, विलास गवळी सर, मासाळ सर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला व तरुण मित्र बहुसंख्येने उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
0 Comments