पंढरपूर, तालुक्यातील गुरसाळे येथील राहणारे शालिवाहन कोळेकर यांना लहानपणापासूनच समाज सेवेची आवड होती. या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्ये केली आहे. धनगर समाजाचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत.कोळेकर यांचा स्वभाव मनमिळाऊ आहे. अनेक वर्षे ते गोरगरीब निराधार जनतेची कामे करताना दिसतात. अशा शालिवाहन कोळेकर यांना दिनांक २५. मे रोजी ए,डी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य व, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्य स्तरीय गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या शुभहस्ते देऊन सत्कार करण्यात येणार आहे. या वेळी कार्यक्रमा चे पाहुणे म्हणून डॉ नितीन वाघमोडे, डॉ सचिन मोटे, तर प्रमुख अतिथी म्हणून चिमन डांगे, चेतन नरोटे, रुक्मिणी ताई गलांडे,राम माडूरके, हे उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त शालिवाहन कोळेकर प्रेमींना उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे
0 Comments