LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

ग्रँड ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून ब्रँड बनवून शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करा : बाळा नांदगावकर बापू तुम्ही ब्रँड आहात शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा ब्रँड रुजला पाहिजे : बाळा नांदगावकरधोत्रेज ग्रुपच्या ग्रँड ट्रॅक्टर्स शोरूमचा मोठ्या दिमाखात उदघाटन सोहळा संपन्न

शेतकरी बांधवांसाठी धोत्रेज उद्योग समूहाच्या वतीने येथील भटुंबरे चौक, टेंभुर्णी-पंढरपूर मार्गावर उभारण्यात आलेल्या ग्रँड ट्रॅक्टर्स शोरूमचे उद्घाटन माजी गृहराज्यमंत्री तथा मनसे नेते बाळा नांदगावकर, धाराशिव बँकेचे चेअरमन ह.भ.प वसंतराव नागदे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाले.
यावेळी मनसे नेते अविनाश अभ्यंकर,आमदार अभिजीत पाटील, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, काँग्रेसचे रॉकी बंगाळे हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी राज्यभरातील मनसेचे नेतेमंडळी, सोलापूर जिल्ह्यातील विविध पक्ष व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, पंढरपुरातील आजी-माजी नगरसेवक यांच्यासह पंढरपूर शहर व तालुक्यातील शेतकरी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उद्घाटन समारंभ कार्यक्रम प्रसंगी बोलताना बाळा नांदगावकर यांनी सुरुवातीला नूतन व्यवसायाबद्दल दिलीप धोत्रे यांना शुभेच्छा देताना निष्ठावान कार्यकर्ता कसा असावा. जनतेसाठी कायम मनाची दारे खुली ठेवणारा. नाती कशी जपावी ही बापू कडून शिकावे. बापू तुम्ही ब्रँड आहात असे उदगार  काढत हा ब्रँड शेतकऱ्यांच्या मनामध्ये रुजला पाहिजे. 
शेतकरी कायम सुजलाम सुफलाम असला पाहिजे असे राज ठाकरे यांचे स्वप्न सत्यात उतरवण्याचे काम ट्रॅक्टर्स शोरूमच्या माध्यमातून पूर्ण होईल शेतकऱ्यांच्या मुलांना कशी मदत होईल यासाठी काम करणे गरजेचे आहे. शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद मराठी मुलांमध्ये आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यासाठी सर्वतोपरी मदत करत आहे. तरुण मुलांनी व्यवसायाबरोबरच  राजकारणात आले पाहिजे. अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी पुढील कार्यासाठी श्रीयश धोत्रे यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी मनसे नेते अविनाश अभ्यंकर, आमदार अभिजीत पाटील, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत दिलीप बापू धोत्रे यांच्या नवीन व्यवसायाला शुभेच्छा दिल्या. 
शेवटी अध्यक्षीय भाषणात धाराशिव बँकेचे चेअरमन ह.भ.प वसंतराव नागदे यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना समाजातील शेवटच्या घटकाला न्याय कसा देता येईल यासाठी काम करण्याचा मोलाचा सल्ला दिला. 
यावेळी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवर मंडळींचे मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी आभार मानले.

यावेळी दयावान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष लखन चौगुले, जय भवानी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुणभाऊ कोळी,विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे, शिवप्रेमीचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब कदम, ज्येष्ठ नेते सुधीर भोसले, शिवसेना जिल्हा संघटक संजय बंदपट्टे, संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे, अकलूज येथील समाजसेवक लक्ष्मण बंदपट्टे, माजी नगरसेवक महादेव धोत्रे, , माजी नगरसेवक अंबादास धोत्रे, सुधाकर बंदपट्टे, लखन चौगुले, आदित्य फत्तेपूरकर, डी.राज सर्वगोड, मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता भोसले, , बाबा बडवे, महेश उत्पात, गणेश उबाळे, रॉकी कुंदूर, माजी नगरसेवक धनंजय कोताळकर, महंमद उस्ताद, यासीन शेख, शिवाजी मस्के,  राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे, सतीश शिंदे, शेतकरी संघटनेचे सचिन पाटील, प्रशांत शिंदे, ऋषिकेश भालेराव, अतुल म्हमाणे, बाबा चव्हाण, संतोष कवडे, शशिकांत पाटील, अमित अवघडे, नॅशनल सेल हेड गौरव मागो, सर्विस स्टेट हेड अशोक इंगळे, कैलास तास्कर, स्वप्निल होवाळ  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments