LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट पॉलीटेक्निक कोर्टी पंढरपूर मधील तीन शाखांना एनबीए (NBA)मानांकन दर्जा प्राप्त


पंढरपूर प्रतिनिधी:
                           न्यु सातारा समूह मुंबई, संचलित न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट पॉलीटेक्निक कोर्टी, तालुका पंढरपूर, जिल्हा- सोलापूर या शिक्षण संस्थेला नॅशनल बोर्ड ऑफ अँक्रेडेशन(NBA) या संस्थेने केलेल्या तपासणीत सिव्हिल इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन इंजिनिअरिंग या तीन ब्रांचला नॅशनल बोर्ड ऑफ अँक्रेडेशन (NBA) हा विशेष दर्जा प्राप्त झाला असून सदर दर्जा प्राप्त करणारी सोलापूर जिल्ह्यातील एक प्रमुख पदविका अभियांत्रिकी कॉलेज असुन सदर मनांकानामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी याचा नक्कीच फायदा होणार आहे.  तसेच काही दिवसांपूर्वी संस्थेच्या न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए.,पंढरपुर या महाविद्यालयास देखील नॅक (NAAC) मानांकन  दर्जा प्राप्त झालेला आहे . त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील दर्जेदार शिक्षण देणारी संस्था अशी ओळख पालक व विद्यार्थ्यान मध्ये निर्माण झाली असुन  या मानांकनांमुळे विद्यार्थ्यांना बराच फायदा होणार असल्याचे मा.प्राचार्य श्री.विक्रम हनुमंत लोंढे  यांनी सांगितले. 
                            व्यावसायिक शिक्षणाला दिवसेंदिवस महत्त्व वाढत असुन व्यवसायिक शिक्षणाचे महत्त्व ओळखून सन- २०१० मध्ये संस्थेचे  संस्थापक अध्यक्ष मा.श्री.राजाराम(नाना) महादेव निकम साहेब यांनी पंढरपूर येथे न्यु सातारा पॉलिटेक्निक कॉलेजची स्थापना करून ग्रामीण भागातील बुद्धिमान तरुणांसाठी उच्च शिक्षणाचे नवे दालन सुरू केले. या व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांना व पालकांना कळले असून आपल्या उज्वल यशाची परंपरा या संस्थेने दाखवून दिले आहे.
                             अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध विभाग जसे मेकॅनिकल इंजिनिअरिंग ,सिव्हिल इंजिनिअरिंग ,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे कोर्स या ठिकाणी सुरू करून अत्याधुनिक विविध ज्ञानाचे दालन विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे. न्यू सातारा पॉलिटेक्निकचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल असुन याद्वारे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास आणि मुलाखत कौशल्यवर भर दिला जातो, प्रत्यक्ष सराव करून घेतला जातो व औद्योगिक क्षेत्र आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यातील दुवा म्हणून हा विभाग काम करतो. या माध्यमातून अभियांत्रिकी पदविकेच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येते. यामधून आज अनेक  नामवंत कंपन्यांमध्ये या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे करिअर उज्वल झाल्याचे दिसून येत आहे . अशी यशस्वी व उज्वल करिअर परंपरा कॉलेजच्या स्थापनेपासून सुरू आहे . न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट पॉलीटेक्निक कोर्टी, पंढरपूर येथे निसर्गरम्य अशा हवेशीर मोकळ्या जागी भव्य दिव्य महाविद्यालयाचे इमारत असून त्या ठिकाणी विविध इमारती सुसज्य उभ्या आहेत स्वतंत्र लॅब ,वसतीगृह,कॅन्टींग,बस सेवा तसेच विद्यार्थी समुपदेशन केंद्र अशा सर्व प्रकारच्या गोष्टी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.मा.प्राचार्य विक्रम हनुमंत लोंढे यांनी महाविद्यालयातील तंज्ञ व अनुभवी प्राध्यापकांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी परिपूर्ण इंजिनिअर व्हावा म्हणून घडवताना त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवणार नाही याची काळजी घेतली आहे, त्यासाठी अद्यावत प्रयोगशाळा, इंटरनेट सुविधा, रात्र अभ्यासिका,  सातत्याने नामांकित कंपन्यांचे कॅम्पसची व्यवस्था केली जाते.प्रत्येक वर्षी विविध अभियांत्रिकी शाखेमधून उज्वल निकालाची परंपरा कॉलेजच्या स्थापनेपासून आज तागायत सुरू आहे. शेकडो विद्यार्थी अभियंता म्हणून नामवंत कंपन्यांमध्ये सेवेत रुजू असुन हीच यशाची उज्वल परंपरा अखंडितपणे कायम ठेवून न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मॅनेजमेंट पॉलिटेक्निक म्हणजे गुणवत्ता पूर्ण शिक्षण अशी ओळख निर्माण केली आहे. महाविद्यालयास मिळालेले NBA मानांकन बाबत महाविद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
                             हे कार्य यशस्वी करण्याकरता कॉलेजचे प्राचार्य मा.श्री.विक्रम लोंढे , प्रशासकीय अधिकारी श्री.ज्ञानेश्वर शेडगे तसेच NBA कोऑर्डिनेटर श्री.विशाल बाड , सर्व टीचिंग व नॉन टीचिंग स्टाफ यांनी परिश्रम घेतले. सदर एनबीए कामकाजामध्ये संस्थेचे अध्यक्ष मा.राजाराम (नाना) निकम साहेब , सर्व संचालक मंडळ व डॉ.लक्ष्मीकांत निकम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले व त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments