LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🌹जिल्हा परिषद शाळा तिऱ्हे येथे प्रवेशोत्सव व नवागतांचे थाटा माटात स्वागत समारंभ साजरा🌹


आज दि. 16/06/2025 रोजी जि. प. प्राथ . शाळा तिऱ्हे ता. उ. सोलापूर येथे सन 2025-26 या नवीन शैक्षणिक वर्षाआरंभी प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत मोठ्या थाटामाटाने करण्यात आले. सर्वप्रथम इ . १ ली त बालकांची टॅक्ट्रर ट्रॉलीतून सर्व विद्यार्थी, पालक व प्रतिष्ठित नागरिकासह प्रभात फेरीने मिरवणूक काढण्यात आली.
त्यानंतर मा. श्री बाळासाहेब सुरवसे ( जि. प. सदस्य ) यांच्या अध्यक्षतेखाली नवागतांचे स्वागत सत्कार विद्यार्थ्याच्या नावाचे ओळखपत्र, फुगे व चॉकलेट देवून करण्यात आला. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेष व पाठय पुस्त कांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सुंदर अशी सजावट करून शाळा सजावट केली होती. त्यानंतर नवागतांचे माझे पहिले पाऊल या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्याच्या पावलाचे ठसे कागदावर उमटवून ती प्रत पालकांना देण्यात आली.
याप्रसंगी गावचे सरपंच श्री गोवर्धन जगताप श्री भास्करबापू सुरवसे श्री अशोक राठोड श्री अरविंद जाधव श्री नेताजी सुरवसे श्री अजय सोनटक्के श्री गोविंद सुरवसे ( अध्यक्ष शा. व्य . स . ) तसेच सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती, श्रीम. बागवान मॅडम ( ग्रा.वि. अधिकारी ) श्री लक्ष्मण सुरवसे मातापालक व प्रतिष्ठित नागरिक  यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमास शोभा आणली.
 शाळेचे मुख्याध्यापक श्री म. ध. उपाध्ये श्रीम. खरात मॅडम, सौ . बनसोडे मॅडम सौ . गवळी मॅडम, सौ . लांबतूरे मॅडम, श्रीम. शेख मॅडम, श्रीम. गायकवाड मॅडम यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments