LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

शाळेचा पहिला दिवस गोपाळपूर येथे विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांकडून जल्लोषात स्वागत



पंढरपूर/प्रतिनिधी 
 
राज्यभरातील शाळांमध्ये आज नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साही सुरुवात झाली. उन्हाळी सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आणि आनंद ओसंडून वाहत होता. 
पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील जिल्हा परिषद शाळेत पहिल्या दिवशी भाजपा तालुका अध्यक्ष प्राध्यापक सुभाष मस्के व ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत शाळेच्या प्रवेशद्वारात गुलाब पुष्प देऊन आणि विद्यार्थ्यांवर फुलांची उधळण करत फटाक्याची आतिषबाजी करून करण्यात आले. 
शाळेचा पहिला दिवस असल्याने प्रवेशद्वार फुग्यांनी, फुलांनी सजवण्यात आले होते.  
यावेळी विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके व जिलेबी वाटप करून करण्यात आली.
यावेळी प्राध्यापक सुभाष मस्के, ज्येष्ठ नेते दिलीप गुरव यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी खास स्वागतपर भाषणे केली. शिक्षकांनी शैक्षणिक वर्षात होणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
 यावेळी उदय पवार, दत्तात्रय गुरव, लक्ष्मण लेंगरे, अरुण बनसोडे, शिवाजी माने, अजय जाधव, अमोल पाटील, उल्हास कोले, गणेश माने, हनुमंत लेंगरे, रघुनाथ पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक सुभाष मस्के यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते.
 
पहिल्यांदाच शाळेचा अनुभव घेणाऱ्या पहिलीतील चिमुकल्यांचे स्वागत विशेष उत्साहात झाले. ज्यामुळे वातावरण आणखी उत्साहवर्धक झाले होते.
दरम्यान शाळेच्या परिसरात गोंगाट, हशा आणि हसण्याच्या आवाजांनी पुन्हा एकदा जीवन फुलले होते.
एकंदरीत, शाळेचा पहिला दिवस हा आनंद, उत्साह आणि नव्या संकल्पांनी भरलेला होता. नवीन पुस्तके, नवीन वर्ग, नवीन मित्र आणि नवीन स्वप्नांसह विद्यार्थ्यांनी नव्या शैक्षणिक वर्षात पहिले पाऊल टाकले.

Post a Comment

0 Comments