LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

महर्षी वाल्मिकी पुलावर भीषण अपघात : ट्रकच्या चाकाखाली चिरडून दुचाकीस्वार ठार



पंढरपूर, ता. १२ जून – चंद्रभागा नदीवरील महर्षी वाल्मिकी पूलाजवळ अंबाबाई पाटंगणा परिसरात आज सायंकाळी अवजड वाहनाच्या धडकेत एक दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका गंभीर होता की मृत व्यक्तीचा देह अक्षरशः चिरडून गेला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हिंदुस्तान पेट्रोलियमच्या टाटा कंपनीच्या MH13 EP 9455 क्रमांकाच्या इंधनाने भरलेल्या ट्रकने हा अपघात केला. संबंधित ट्रक पंढरपूर शहरातून सुस्त्याकडे जात असताना, स्प्लेंडर दुचाकीवर घरी निघालेल्या युवकाला महर्षी वाल्मिकी पुलावर जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत दुचाकीस्वार ट्रकच्या चाकाखाली चिरडला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळण्याचा प्रयत्न करत होता, मात्र स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

घटनास्थळी पंढरपूर शहर पोलिस दाखल झाले असून मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी ट्रक जप्त केला असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments