LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचे उपाध्यक्ष मारुती अंबुरे शिवसेनेत

मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचे उपाध्यक्ष श्री. मारुती भाऊ अंबुरे यांनी पक्षात प्रवेश केला. त्यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश करून शिवसेनेचे शिवबंधन बांधून घेतले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर कायम राहून माळशिरस तालुक्यामधील शिवसेना मजबूत  करण्याचा निर्धार केला.  शिवसेना जिल्हाप्रमुख, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती सदस्य, श्री संभाजी शिंदे यांच्या हस्ते मा शिवसेना पक्ष प्रमुख श्री उद्धव ठाकरे साहेबांचा सत्कार शाल, दैनंदिनी व पुष्प गुच्छ देऊन करण्यात आला. त्यावेळी शिवसेना नेते विनायकजी राऊत साहेब, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ साहेब, युवा सेनेचे गणेश इंगळे तालुकाप्रमुख संतोष राऊत,महादेव बंडगर, अनिल बनपट्टे त्याचप्रमाणे विधानसभा संपर्कप्रमुख प्रशांत मांडरकर,काशिनाथ बासुतकर, उमेश सारंग व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. त्यावेळी घेतलेले छायाचित्र

Post a Comment

0 Comments