प्रतिनिधी
पंढरपूर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला. व छत्रपतींचे समाधी स्थळ असलेला व हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला छत्र निजामपूर हे नाव असलेल्या ग्रामपंचायत अंतर्गत येत होता गेल्या एक महिन्यापूर्वी लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब या किल्ल्यावर भेट देण्यासाठी गेले असता तेथील नागरिकांनी हा प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला निजामाच्या खुणा पुसण्याच्या उद्देशाने छत्रपतींनी स्वराज्य उभा केलं परंतु रायगड किल्ला निजामपूर ग्रामपंचायत येतो हे खेद जनक गोष्ट असल्याचे पडळकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व ग्रामविकास मंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्याकडे हे नाव बदलून रायगड वाडी ग्रामपंचायत करावी अशी मागणी केली होती अधिवेशन काळामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांनी छत्रनिजामपुर हे नाव बदलून रायगड वाडी ग्रामपंचायत हे नाव जाहीर केले त्यामुळे छत्रपतींच्या स्वराज्याचा सन्मान नक्की वाढला हे हिंदुत्ववादी सरकार निजामाच्या व मोगलांच्या सर्व खुणा संपवत असल्याचा अभिमान आहे म्हणून आज भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने पालकमंत्री महोदयांचा जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार व माऊली भाऊ हळणवर व सांगलीचे नेते पप्पू शेठ डोंगरे यांच्या हस्ते जयकुमार गोरे भाऊंचा सत्कार करून आभार मानले यावेळी माढा मंडलाचे अध्यक्ष योगेश पाटील टेंभुर्णी मंडळाचे अध्यक्ष योगेश बोबडे यांच्या सह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते
0 Comments