दरवर्षीप्रमाणे श्री संत सावतामाळी महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त संत पेठ पंढरपूर या ठिकाणी असणाऱ्या श्री संत शिरोमणी सावता माळी मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो यामध्ये संत शिरोमणी सावता माळी महाराज चरित्र, पारायण, कीर्तन , प्रवचन यासारख्या धार्मिक कार्यक्रमास सोबत वेगवेगळे सांप्रदायिक कार्यक्रम राबवले जातात शेवटी सप्ताहाची सांगता अमावस्या दिवशी श्रीफळ दहीहंडीने केली जाते व त्यासोबतच पंढरपुरातील प्रदक्षिणा मार्गावरून श्री संत शिरोमणी सावता माळी महाराजांच्या पालखीचे मिरवणूक मोठ्या उत्साहात भक्तीभावाने पार पडते यामध्ये माळी समाजातील बहुसंख्य तरुण , जेष्ठ व महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो याशिवाय वारकरी संप्रदायातील सर्व वारकरी भक्तांचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो...
0 Comments