सोलापूर:- माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब व खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या शिफारसीनुसार उच्चशिक्षित चार्टर्ड अकाउंट असलेले, सामाजिक कार्यकर्ते, श्री. सुशील बंदपट्टे यांची सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून जनवात्सल्य कार्यालय सोलापूर येथे सुशील बंदपट्टे यांच्या निवडीचे पत्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या हस्ते, सोलापुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ उद्योगपती दत्ता आण्णा सुरवसे, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, चक्रपाणी गज्जम, राजाभाऊ कलकेरी, दीपक जाधव, महेश अलकुंटे, दत्तात्रय अलकुंटे, संतोष इरकल, गोपाळ पाथरूट श्याम मुद्दे, अशोक यमपूरे, भीमाशंकर बंदपट्टे, श्रीनिवास यमपूरे, जयवंत यमपूरे, राहुल भरले, अतिश अलकुंटे, कुणाल भांडेकर, नरेंद्र अलकुंटे यांच्यासह समस्त वडार समाज व चंद्रनील मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
0 Comments