उपसभापती प्रतापराव (आबा)पाटील युवकांचे प्रेरणास्थान नेतृत्व -- प्रा. नरेंद्र भोसले
सामाजिक चळवळीत अनेक प्रकारचे नेते असतात. काही लोक बडबड करण्यात पटाईत असतात तर काही लोक बोलण्यापेक्षा कृती करण्याला महत्त्व देतात. निर्जरासारखा खळखळाट करण्यापेक्षा गंगाधारेसारखा संत वाहत राहुन गांवचा विकास करणारे नेतृत्व म्हणजे प्रतापराव (आबा ) पाटील .
मा.प्रतापराव (आबा ) पाटील हे बोरगांव गांवचे सुपुत्र आहेत.गेली अनेक वर्षे ते सामाजिक, राजकीय, क्षेत्रात कार्यरत आहेत. 24 तास जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांचा वाडा खुला असतो, सर्व जाती धर्मातील लोकांसाठी अहोरात्र काम ते करतात.त्यांनी गावांत पहिल्यांदा सर्व महापुरुषांची जयंती साजरी करण्यास सुरुवात केली, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्यदिव्य कार्यक्रम त्यांनी आयोजित केले, त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती आधारित डॉ.अमोल कोल्हे यांचें महानाट्य आयोजित केले होते, सामुदायिक विवाह सोहळा, व्याख्याने आयोजित केली,
ग्रामपंचायत सदस्य ते उपसभापती पदा पर्यंत आबांचा प्रवास हा फक्त लोंकाच्या समस्या सोडविण्यासाठी व पुर्व भागातील बोरगांव, माळखांबी, जांभुड,मिरे, नेवरे,खळवे,तोंडलें,बोंडले, विठ्ठलवाडी,उघडेवाडी या गावातील विविध विकासकामे करण्यासाठी या पदाचा त्यांनी वापर केला.त्यांचा प्रयत्नातून अनेक योजना आज बोरगांव व पुर्व भागात सुरू आहेत.
विधानपरिषदचे लोकप्रिय आमदार रणजितसिंह मोहिते पाटील साहेब यांचें अत्यंत विश्वासू समर्थक म्हणून मा.प्रतापराव पाटील पुढे आलेले नेतृत्व आहेत.
विजय प्रताप युवा मंच्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रम केले, बंधारे बांधले, गावात सार्वजनिक विजय प्रताप वाचनालय सुरू केले, आज बोरगांव गावच्या विकासासाठी अनेक योजना त्यांनी नामदार रणजितसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहेत.
माढा लोकसभा निवडणुकीत खासदार धैर्यशील (भैय्यासाहेब) मोहिते पाटील साहेब यांना विजयी करण्यासाठी मा.शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या नियोजनांखाली माढा लोकसभा मतदार संघातील पंढरपूर तालुक्यातील 42 गावांतील महत्त्वपूर्ण जबाबदारी प्रतापराव पाटील यांचेंकडे होते.त्यांनी त्यांचें नेतृत्व कौशल्य दाखवून प्रत्येक गावातील लोकांना मार्गदर्शन केले,त्यांना मतदान करण्यासाठी तयार केले.
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी टेंभुर्णी येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी खासदार धैर्यशील (भैय्यासाहेब) मोहिते पाटील यांच्या बरोबर आबाच्यावरती ही गुन्हा दाखल झाला होता.
शांत संयमी चारित्र्यसंपन्न, कणखर अभ्यासू नेतृत्व म्हणजे प्रतापराव आबा पाटील,
मनमिळावू स्वभाव, जनतेसाठी सदैव तत्पर आणि महत्वांची बाब म्हणजे खराला खरं आणि खोट्याला खोटे म्हणारे स्पष्टवक्ते नेतृत्व म्हणजे प्रतापराव (आबा) पाटील.
अशा दिलदार व्यक्तीमत्ववाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्रा नरेंद्र भोसले.महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष सामाजिक न्याय विभाग.
मो.9158681826
0 Comments