LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*राजाराम शिक्षण संकुलाच्या प्राचार्या सौ.रजनीताई जाधव सेवानिवृत्त*



दि.31 जुलै 2025 या दिवशी हा कार्यक्रम संपन्न झाला. सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे पाणीदार आमदार समाधान दादा आवताडे साहेब,माढा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अभिजीत आबा पाटील, पुणे शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत सर, श्री अरविंद जाधव साहेब राजाराम शिक्षण संकुलाचे अध्यक्ष,पंढरपूर नगरपालिका ( माजी नगराध्यक्ष ) श्री राज  जाधव उपाध्यक्ष राजाराम शिक्षण संकुल,श्री बोडरे सर पंढरपूर नगरपालिका केंद्र समन्वयक यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला सर्वप्रथम महिला शिक्षणाच्या आद्य क्रांतिकारी म्हणून आपण ज्यांना ओळखतो सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर सन्माननीय प्रा.शरद चव्हाण सर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली. प्रस्तावना सादर केल्यानंतर कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती सौ. रजनीताई जाधव मॅडम यांचा आमदार समाधान दादा आवताडे तसेच आमदार श्री अभिजित आबा पाटील व पुणे शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांचे सत्कार राजाराम शिक्षण संकुलाचे अध्यक्ष श्री अरविंद जाधव सर यांच्या हस्ते करण्यात आले.
 सत्कार समारंभा नंतर श्री अरविंद जाधव साहेब यांनी प्राचार्या सौ. रजनीताई जाधव मॅडम यांच्या कार्यकाळाविषयी भावना व्यक्त केल्या. श्री सावंत सर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राजाराम शिक्षण संकुलाचा प्राचार्य सौ.रजनीताई जाधव मॅडम यांनी संस्था स्थापनेपासून ते सेवानिवृत्त होण्यापर्यंतचा प्रवास आपल्या भावना शब्दांमध्ये व्यक्त केल्या. आणि कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष माढा मतदारसंघाचे अभिजीत आबा पाटील यांनी सेवानिवृत्त सौ रजनीताई जाधव मॅडम यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या व भावी आयुष्य दीर्घायुषी व निरोगी व उत्तम राहो यासाठी पण शुभेच्छा दिल्या. त्यांनी व्यक्त केलेल्या भावना या प्रेरणादायी व मार्गदर्शक होत्या.
 श्रावण महिन्याच्या या पवित्र काळामध्ये आनंदित व प्रफुल्लित असतात. आणि त्याच काळामध्ये सेवानिवृत्तीचा कार्यक्रम हा आमच्यासाठी जड अंतकरणाचा ठरला अशा संमिश्र वातावरणात आजचा कार्यक्रम संपन्न झाला. काहीजण राजाप्रमाणे वारसा सोडून जातात ते कधीही नष्ट होत नाही अशी व्यक्ती आपल्या प्राचार्या होत्या. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्या हृदयामध्ये त्यांनी प्रेम व कायमचा आदर कोरला.
.       " तुमच्या आजूबाजूला पहा. या खोलीत असे एकही जीवन नाही ज्याला तुम्ही स्पर्श केला नाही आणि त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक जण चांगला माणूस आहोत "
 तुम्ही दाखवलेल्या अनेक धड्यापैकी म्हणजे तुम्ही सर्वांची काळजी घेतली, म्हणून तुमच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा विश्वास व आदर तुम्ही मिळवला. तुम्ही आमच्या प्रत्येकाला दाखवलेला आदर, महत्त्वाचे म्हणजे निर्णय घेताना आम्हाला सहभागी करून घेण्याची तुमची तयारी. आणि उत्सुकता ही आम्हा सर्वांच्या मनामध्ये कायम राहील. तुम्ही तुमच्या कार्याशी समर्पित होता, गाभ्याशी प्रामाणिक होता, जीवनात साधे होता, दबावाखाली शांत राहण्यास सक्षम होता, आणि राग आला कधीही बळी पडला नाहीत. हे तुमचे जीवन वैशिष्ट्य आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी व आशादायक राहील.
 तुम्ही सर्व अभ्यासक्रमासाठी निकाल सुधारण्यासाठी सक्षम होताच. शिवाय विद्यार्थ्यांसाठी तणावमुक्त शिक्षण वातावरण देखील तुम्ही निर्माण केले. तुम्ही सर्व शिक्षकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न केले. आणि शिक्षण व संशोधनाद्वारे कायम तुम्ही विकासाला चालना दिली. 
 हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजाराम शिक्षण संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाची सहकार्य केले. आणि कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापक अनिल पवार सर यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले आणि कार्यक्रम संपला. व सूत्रसंचालन प्राध्यापक कैलास उबाळे सर यांनी व्यवस्थित शब्दरूपी फुलांची माळ गुंफून सादर केला.

Post a Comment

0 Comments